अ‍ॅपशहर

तुघलककडूनही नोटाबंदी: यशवंत सिन्हा

नोटाबंदी व ‘जीएसटी’च्या निर्णयावरून केंद्र सरकारला घरचा आहेर देणारे भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारला धारेवर धरले आहे; तसेच ‘दिल्लीचा सुलतान मोहम्मद बिन तुघलकनेही चौदाव्या शतकात म्हणजेच ७०० वर्षांपूर्वी नोटाबंदी केली होती,’ असे म्हणत सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना तुघलकाशी केली आहे.

Maharashtra Times 16 Nov 2017, 2:19 am
वृत्तसंस्था, अहमदाबाद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम tughlaq had also implemented note ban yashwant sinhas dig at pm
तुघलककडूनही नोटाबंदी: यशवंत सिन्हा


नोटाबंदी व ‘जीएसटी’च्या निर्णयावरून केंद्र सरकारला घरचा आहेर देणारे भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारला धारेवर धरले आहे; तसेच ‘दिल्लीचा सुलतान मोहम्मद बिन तुघलकनेही चौदाव्या शतकात म्हणजेच ७०० वर्षांपूर्वी नोटाबंदी केली होती,’ असे म्हणत सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना तुघलकाशी केली आहे.

अहमदाबाद येथे ‘लोकशाही बचाव अभियाना’तर्फे आयोजित कार्यक्रमात जीएसटी आणि नोटाबंदीवर बोलताना सिन्हा यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींवर घणाघात केला. ‘यापूर्वी अनेक राजांनी त्यांच्या त्यांच्या कार्यकाळात नव्या मुद्रा चलनात आणल्या होत्या. नव्या मुद्रा चलनात आणताना जुन्या मुद्राही कायम ठेवल्या होत्या; परंतु चौदाव्या शतकात मोहम्मद तुघलकने नव्या मुद्रा चलनात आणून जुन्या मुद्रा चलनातून बाद केल्या होत्या. म्हणजेच ७०० वर्षांपूर्वी पहिली नोटाबंदी आणली गेली होती,’ असे सांगत सिन्हा यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला.

सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’च्या अहवालाचा हवाला देऊन सिन्हा म्हणाले, ‘नोटाबंदीमुळे ज्या नव्या नोटा छापाव्या लागल्या, त्याचा थेट खर्च जवळपास १ लाख २८ हजार कोटी रुपये इतका आहे. नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्था दीड टक्क्यांनी खाली आली. खरे तर ही टक्केवारी अधिक आहे, यावर माझा विश्वास आहे.

तरीही दीड टक्के इतकाच धरले, तरी अर्थव्यवस्थेला २.२५ लाख कोटी रुपयांचा फटका बसला. म्हणजेच नोटाबंदीचा खर्च आणि अर्थव्यव्यवस्थेला फटका असे जवळपास ३.७५ लाख कोटी रुपयांचे अर्थव्यवस्थेचे थेट नुकसान झाले आहे.’

कोण आहे तुघलक?

तुघलक हा चौदाव्या शतकात दिल्लीचा सुलतान होता. अत्यंत कमी काळ त्याने दिल्लीच्या गादीवर राज्य केले. वादग्रस्त निर्णयांसाठी तो जास्त ओळखला जातो. त्याने दिल्लीऐवजी दौलताबादला राजधानीचा दर्जा दिला होता. त्यानेच मानक करन्सीची सुरुवात केली होती. तुघलक येण्यापूर्वी सोने आणि चांदीचे नाणे चलनात होते. त्याच्या सत्ताकाळात तांब्याचे नाणेही चलनात वापरले जाऊ लागले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज