अ‍ॅपशहर

भारतासह २१ देशात ट्विटर डाउन, युजर्सचा संताप

सोशल नेटवर्किंग साइटवरचे लोकप्रिय असलेले ट्विटर पुन्हा एकदा डाउन झाले आहे. ट्विटर हे डाउन झाल्याने जगभरातील युजर्सला ट्विट करणे शक्य होत नाही, त्यामुळे नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Aug 2019, 8:52 pm
नवी दिल्ली ः सोशल नेटवर्किंग साइटवरचे लोकप्रिय असलेले ट्विटर पुन्हा एकदा डाउन झाले आहे. ट्विटर हे डाउन झाल्याने जगभरातील युजर्सला ट्विट करणे शक्य होत नाही, त्यामुळे नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम twitter


आज सायंकाळच्या सुमारास अचानक ट्विटर डाउन झाले आहे. ट्विटरवर अॅक्टिव असलेल्या युजर्सना ट्विट करता येत नाही. तसेच केले गेलेले ट्विट रिट्विट करता येत नाहीत. त्यामुळे ट्विटरवर सक्रीय असलेल्या युजर्सच्या संतापाचा पारा चढला आहे. भारत, कॅनडा, जपान, ब्राझील, यूके आणि अमेरिकेसह जगभरातील २१ देशात ट्विटर डाउन झाले आहे. ट्विटर युजर कोणतेही ट्विट करण्याचा प्रयत्न करीत असल्यास त्याला 'Something Went Wrong' आणि Try हे दोन मेसेज येत आहेत. ट्विटर हे पहिल्यांदा डाउन झालेले नाही. याआधीही ट्विटरवर यासारखी समस्या उद्धभवली आहे. ट्विटर नेमक्या कोणत्या कारणामुळे डाउन झाले याविषयीची ट्विटरकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज