नवी दिल्ली : मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट ट्विटरनं भारताचे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांच्या वैयक्तिक ट्विटर अकाऊंटवरील (@MVenkaiahNaidu) ब्लू टीक (निळ्या रंगाचं चिन्ह) हटवलीय. वृत्तसंस्था एएनआयनं उपराष्ट्रपतींच्या कार्यालयाच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार, 'ट्विटरनं भारताचे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांच्या खासगी ट्विटर हॅन्डलवरून ब्लू व्हेरीफाईड बॅच हटवला आहे'.
परंतु, भारताच्या उपराष्ट्रपतींच्या अधिकृत हॅन्डल (@VPSecretariat) वर मात्र ही ब्लू टीक कायम आहे.
उल्लेखनीय म्हणजे, नायडू यांच्या वैयक्तिक ट्विटर हॅन्डलवर १३ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तर, उपराष्ट्रपतींच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवर ९.३ लाख फॉलोअर्स आहेत.
ट्विटरच्या पॉलिसीनुसार, ब्लू व्हेरीफाईड बॅच इतर ट्विटरकर्त्यांना हे सांगण्यासाठी मदत करतो की, संबंधीत ट्विटर हॅन्डल खात्रीशीर, उल्लेखनीय आणि सक्रिय आहे. ट्विटरकडून अशा ब्लू टीक सरकारी कंपन्या, ब्रॅन्ड, गैर सरकारी संघटना, वृत्त संस्था, पत्रकार, राजकीय - मनोरंजन - खेळ - गेमिंगशी क्षेत्राशी निगडीत व्यक्ती तसंच इतर प्रभावशाली व्यक्तींच्या ट्विटर हॅन्डलला देण्यात आल्या आहेत.
ट्विटरच्या धोरणानुसार, कोणत्याही वेळी आणि कोणत्याही सूचनेशिवाय किंवा नोटिशीशिवाय ट्विटर हॅन्डलवरून ब्लू टीक आणि व्हेरिफाईड स्टेटस हटवला जाऊ शकतो.