अ‍ॅपशहर

श्रीनगर: दहशतवादी हल्ल्यात २ भारतीय जवान शहीद

जम्मू काश्मीरमधील श्रीनगरमध्ये बीएसएफच्या पथकावर झालेल्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यानंतर दहशतवादी भारतीय जवानांच्या रायफल घेऊन पळून गेले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 May 2020, 6:35 pm
श्रीनगर: जम्मू-कश्मीरच्या श्रीनगरच्या पंदाच भागात सीमा सुरक्षा बलाच्या (बीएसएफ) पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात बीएसएफचे दोन जवान शहीद झाले. या हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, ते गंभीर जखमी झाले होते. या हल्ल्यात ते शहीद झाले आहेत. भारतीय जवान गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांची हत्यारे दहशतवाद्यांनी पळवल्याचे वृत्त आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला, २ जवान शहीद


या हल्ल्याबाबत प्राथमिक माहितीनुसार, सीमा सुरक्षा दलाच्या ३७ बटालियन गस्त घालून परतत असताना अचानक दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. हा हल्ला अचानक झाल्याने जवानांना सावरण्यासाठी जराही वेळ मिळू शकला नाही. या हल्ल्यानंतर इतर जवान आणि स्थानिक लोकांनी तातडीने जखमी जवानांना नजिकच्या रुग्णालयात नेले. या हल्ल्यात एकूण ७ जवान जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या ७ जवानांपैकी २ जवान गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना स्किम्स सौरा येथे हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, तेथे हलवताना ते वाटेतच शहीद झाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज