अ‍ॅपशहर

पाकिस्तानच्या गोळीबारात दोन जवान जखमी

जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील सीमारेषेवर पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात दोन जवान जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी रात्री घडली, अशी माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Jul 2019, 4:00 am
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील सीमारेषेवर पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात दोन जवान जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी रात्री घडली, अशी माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम two jawans injured in pakistan firing
पाकिस्तानच्या गोळीबारात दोन जवान जखमी


नौशेरा भागातील रोमाली, धारा भागातील लष्करी चौक्यांवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करून पाकिस्तानने शुक्रवारी रात्री गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा केला. या गोळीबारात दोन जवान जखमी झाले आहेत. लष्कराने या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिल्यानंतर पाकिस्तानकडून गोळीबार बंद झाला, अशी माहिती लष्कराच्या प्रवक्त्याने दिली आहे. जखमी जवानांवर लष्कराच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज