अ‍ॅपशहर

बिहारमध्ये हिंसाचारात दोन ठार

राष्ट्रीय जनता दलाच्या एका स्थानिक नेत्याच्या हत्येनंतर बिहारच्या नालंदा जिल्ह्यात उसळलेल्या हिंसाचारात जमावाने केलेल्या बेदम मारहाणीत बुधवारी एका किशोरवयीन मुलासह दोघांचा मृत्यू झाला, तर अन्य एक जण जबर जखमी झाला आहे.

PTI 3 Jan 2019, 4:00 am
वृत्तसंस्था, बिहारशरीफ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम two killed in violence in bihar
बिहारमध्ये हिंसाचारात दोन ठार


राष्ट्रीय जनता दलाच्या एका स्थानिक नेत्याच्या हत्येनंतर बिहारच्या नालंदा जिल्ह्यात उसळलेल्या हिंसाचारात जमावाने केलेल्या बेदम मारहाणीत बुधवारी एका किशोरवयीन मुलासह दोघांचा मृत्यू झाला, तर अन्य एक जण जबर जखमी झाला आहे.

राजदच्या अनुसूचित जाती-जमाती आयोगाचा पदाधिकारी असलेल्या इंदाल पासवान याची मंगळवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली. नालंदा जिल्ह्यातील दीपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मघंदासराई गावात राहणारा पासवान हा एका कार्यक्रमाहून घरी परतत असताना ही हत्या झाली. पासवान घरी न परतल्याने त्याच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीनंतर शोध घेतला असता, जवळच्या शेतात गोळ्यांनी चाळण झालेला त्याचा मृतदेह मिळाला. हे कळताच पासवान याचे समर्थक मोठ्या संख्येत त्या ठिकाणी जमले आणि या हत्येमागे चुन्नीलाल नामक स्थानिक व्यक्तीचा हात असल्याचा आरोप करत घोषणाबाजी करू लागले. त्यानंतर मोठा जवान चुन्नीलाल याच्या घरावर चालून गेला आणि घराला आग लावली. जमावाने चुन्नीलाल याचे सहकारी रंजय यादव आणि संतू मलाकर यांनाही जबर मारहाण केली. यात या दोघांचा मृत्यू झाला. रंजय हा किशोरवयीन असल्याचे सांगण्यात आले.

पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणून जमावाला पांगवले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज