अ‍ॅपशहर

impeachment: काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात

सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधातील महाभियोगाचा प्रस्ताव उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी फेटाळून लावल्यानंतर काँग्रेसने आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. काँग्रेसच्या दोन खासदारांनी याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश चेलमेश्वर यांच्यासमोर याचिका दाखल केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 May 2018, 1:14 pm
नवी दिल्ली: सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधातील महाभियोगाचा प्रस्ताव उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी फेटाळून लावल्यानंतर काँग्रेसने आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. काँग्रेसच्या दोन खासदारांनी याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश चेलमेश्वर यांच्यासमोर याचिका दाखल केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम two rajya sabha mps move sc challenging rejection of impeachment notice against cji
impeachment: काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात


खासदार अमी याज्ञिक आणि प्रतापसिंह बाजवा यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून काँग्रेसचे खासदार, ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि प्रशांत भूषण याप्रकरणी बाजू मांडत आहेत. 'सुनावणीसाठी याचिकेचा नंबर लवकर आला नाही तर तुम्ही सरन्यायाधीशांकडे जाऊ शकता,' असे निर्देश चेलमेश्वर यांनी सिब्बल आणि भूषण यांना दिले आहेत. मात्र सरन्यायाधीशांविरोधातच हे प्रकरण असल्याने त्यांच्याकडे हे प्रकरण घेऊन जाता येणार नाही, असा युक्तिवाद वकिलांनी केला. त्यामुळे उद्या हे प्रकरण पटलावर ठेवण्याचे निर्देश चेलमेश्वर यांनी दिले आहेत.

काँग्रेससह ७ राजकीय पक्षांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणला होता. तशी नोटीस राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना दिली होती. मात्र त्यांनी हा प्रस्तावच फेटाळून लावल्याने काँग्रेसने न्यायालयात धाव घेतली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज