अ‍ॅपशहर

अरुणाचल प्रदेश सीमेवरून दोन भारतीय जवान १४ दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबीय चिंतेत

अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या भारत-चीन सीमेवरून दोन जवान बेपत्ता झाले आहेत. गेल्या १४ दिवसांपासून दोन्ही जवानांचा शोध लागलेला नाही. हे जवान नदीत बुडाल्याची भीती लष्कराकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Jun 2022, 2:42 pm

हायलाइट्स:

  • अरुणाचल प्रदेशातून दोन जवान बेपत्ता
  • चिनी सीमेवर तैनात असलेले जवान बेपत्ता
  • दोन्ही जवानांचे कुटुंबीय चिंतेत
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम two soldiers posted in arunachal pradesh goes missing
अरुणाचल प्रदेशातून दोन भारतीय जवान बेपत्ता
नवी दिल्ली: अरुणाचल प्रदेशातील भारत-चीन सीमेवरून लष्कराचे दोन जवान बेपत्ता झाले आहेत. हरेंद्र नेगी आणि प्रकाश सिंह राणा अशी या जवानांची नावं आहेत. राणा आणि नेगी २८ मेपासून बेपत्ता आहेत. बेपत्ता झालेले जवान उत्तराखंडचे रहिवासी आहेत. राणा आणि नेगी बेपत्ता असल्याची माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबीयांना दिली. तेव्हापासून दोघांचे कुटुंबीय चिंतेत आहेत. या प्रकरणी लष्करानं कोणतीही अधिकृत माहिती अद्याप प्रसिद्ध केलेली नाही.
मूळचे रुद्रप्रयाग जिल्ह्यातल्या उखीमठचे रहिवासी असलेले राणा ७ व्या गढवाल रायफल्सचे जवान आहेत. अरुणाचल प्रदेशातील भारच-चीन सीमेवरील ठकला सीमेवर तैनात होते. गेल्या १३ दिवसांपासून ते बेपत्ता आहेत. यामुळे त्यांची पत्नी ममता, दोन मुलं अनुज आणि अनामिका चिंताग्रस्त आहेत. अनुज १० वर्षांचा असून अनामिका ७ वर्षांची आहे.

प्रकाश सिंह राणा २८ मेपासून बेपत्ता असल्याची माहिती लष्कराकडून आम्हाला २९ मे रोजी देण्यात आल्याचं त्यांच्या पत्नी ममता यांनी सांगितलं. यानंतर लष्कराच्या अधिकाऱ्यांनी ९ जूनला ममता यांना दुसऱ्यांदा फोन केला. बेपत्ता झालेले दोन्ही जवान नदीत बुडाले असावेत, अशी भीती त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आली.
लकव्यावर मात करत त्याने पूर्ण केलं सैन्यात अधिकारी होण्याचं स्वप्न...; वाचा दानिशची प्रेरणादायक कथा
भाजप आमदारानं घेचली कुटुंबीयांची भेट; सहकार्याचं आश्वासन
सहसपूर मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार सहदेव सिंह पुंडिर यांनी सैनिकी वसाहतीत जाऊन राणा यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. मी याबद्दल संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांच्याशी संवाद साधला. पूर्णपणे सहकार्य करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे, अशी माहिती पुंडिर यांनी दिली. बेपत्ता जवान राणा यांच्याबद्दलचा संपूर्ण तपशील आपण भट्ट यांनी पाठवल्याचं त्यांनी सांगितलं.
राष्ट्रपती निवडणुकीत भाजपचे पारडे जड; राज्यसभेतील विजय फायद्याचा
पूनम नेगी म्हणतात, यावर विश्वास ठेवणं कठीण
दोन्ही जवान नदीजवळ गेले आणि त्याची कल्पना कोणालाच नव्हती यावर विश्वास ठेवणं कठीण असल्याचं हरेंद्र नेगींच्या पत्नी पूनम नेगी म्हणाल्या. पूनम आणि हरेंद्र यांच्या लग्नाला ३ वर्षेच झाली असून त्यांना १ वर्षांचा मुलगा आहे.

महत्वाचे लेख