श्रीनगर : पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी आणि त्यांचा एक साथीदार असे तिघे शनिवारी ठार झाले. पुलवामा जिल्ह्यातील गोरीपोरा भागात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी या भागाला वेढा दिला. शोधमोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याने जवानांनी त्यास प्रत्युत्तर दिले. यात तिघे मारले गेले.
दोन दहशतवादी ठार
पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी आणि त्यांचा एक साथीदार असे तिघे शनिवारी ठार झाले...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Apr 2020, 4:00 am