अ‍ॅपशहर

उमा भारती आश्रमात पडल्या; पायाला फ्रॅक्चर

भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा उमा भारती या ऋषीकेश येथील एका आश्रमात पाय घसरून पडल्याने त्यांच्या डाव्या पायाला दोन ठिकाणी फ्रॅक्चर झालं आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ डेहराडूनच्या जॉलिग्रांट येथील हिमालयन रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Nov 2019, 6:51 am
ऋषीकेश: भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा उमा भारती या ऋषीकेश येथील एका आश्रमात पाय घसरून पडल्याने त्यांच्या डाव्या पायाला दोन ठिकाणी फ्रॅक्चर झालं आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ डेहराडूनच्या जॉलिग्रांट येथील हिमालयन रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम uma-bharti


उमा भारती यांनी स्वत: ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. मी ऋषीकेशला आले होते. रविवारी दुपारी ४ वाजता जेवनानंतर मी गरुडट्टी येथे पोहोचले. गरुडचट्टीवर घनदाट जंगलामध्ये गंगा नदीच्या किनारी राम तपस्थळ आहे. तिथे आम्ही एक दिवस थांबणार होतो. मात्र काल मी पाय घसरून पडले. त्यामुळे माझ्या पायाला सूज आली. रात्रभर पाय ठणकत होता. त्यामुळे सकाळीच मला डेहराडूनच्या हिमालयन रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे एक्सरे काढल्यानंतर माझ्या डाव्या पायातील पंजामध्ये दोन ठिकाणी हाड मोडल्याचं दिसून आलं. तसेच माझ्या डोक्यालाही मार लागल्याचं दिसून आल्याने माझ्यावर उपचार सुरू करण्यात आलं आहे, असं उमा भारती यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.


मला डॉक्टरांनी रुग्णालयातून जाण्यास मनाई केली आहे. त्यामुळे २४ तासांसाठी मला रुग्णालयातच उपचार घ्यावे लागणार आहेत. माझ्या पायाला प्लास्टर करण्यात आलं असून दीड महिने पायाला हे प्लास्टर राहणार आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे उमा भारती यांना आता दीड महिना सक्तीने आराम करावा लागणार आहे. त्या ऋषीकेश येथे गोमुखपासून गंगासागरपर्यंत गंगेची यात्रा करण्यासाठी आल्या होत्या. मात्र दुखापतीमुळे त्यांना विश्रांती घ्यावी लागणार आहे.

उमा भारती: साध्वी प्रज्ञा महान संत; मी मूर्ख ...


उमा भारती आडवाणींच्या घरी, झाल्या नतमस्तक

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज