अ‍ॅपशहर

इंग्रजीच्या भीतीनं दहावीच्या मुलीनं पेटवून घेतलं!

इंग्रजी जमत नसल्यानं नैराश्य आलेल्या १६ वर्षांच्या एका मुलीनं स्वत:ला जाळून घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना केरळच्या तिरुवन्नामलाई जिल्ह्यात घडली आहे. भवानी असं या मुलीचं नाव असून ती दहावीच्या वर्गात शिकत होती.

Maharashtra Times 28 Jul 2016, 12:39 pm
मटा ऑनलाइन वृत्त । तिरुवन्नामलाई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम unable to cope with english teen ends life
इंग्रजीच्या भीतीनं दहावीच्या मुलीनं पेटवून घेतलं!

इंग्रजी जमत नसल्यानं नैराश्य आलेल्या १६ वर्षांच्या एका मुलीनं स्वत:ला जाळून घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना केरळच्या तिरुवन्नामलाई जिल्ह्यात घडली आहे. भवानी असं या मुलीचं नाव असून ती दहावीच्या वर्गात शिकत होती.

तिरुवअन्नामलाई जिल्ह्यातील थावसी कुलम गावात राहणारी भवानी किलनाथूर येथील महापालिकेच्या शाळेत शिकत होती. इंग्रजी विषय तिला अतिशय कठीण जात होता. प्रयत्न करूनही तिला इंग्रजी समजायेच नाही. चाचणी परीक्षेत तिला या विषयात कमी गुण मिळाले होते. त्यामुळं तिला नैराश्यानं ग्रासलं होतं. त्या नैराश्यातूनच सोमवारी सकाळी तिनं टोकाचं पाऊल उचलंल. घरात कुणीही नसताना अंगावर रॉकेल ओतून घेऊन तिनं स्वत:ला पेटवून घेतलं.

इंग्रजीच्या भीतीबद्दल भवानीनं अनेकदा तिच्या भावंडांना सांगितलं होतं. मला शाळेतच जावंसं वाटत नाही असंही ती म्हणायची, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक चौकशी सुरू आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज