अ‍ॅपशहर

chhota rajan : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनची करोनावर मात, एम्समधून डिस्चार्ज

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन हा करोनामुक्त झाला आहे. करोना पॉझिटिव्ह आढळ्यानंतर त्याला उपचारासाठी दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वी त्याच्या मृत्युची अफवाही उठली होती.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 May 2021, 8:33 pm
नवी दिल्लीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन ( chhota rajan ) करोनातून बरा झाला आहे. यामुळे एम्समधून डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर त्याची रवानगी पुन्हा तिहार तुरुंगात करण्यात आली आहे. छोटा राजन करोनामुक्त झाल्याने त्याला तिराह तुरुंगात पाठवण्यात ( underworld don chhota rajan discharged ) आलं आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम chota rajan
अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनची करोनावर मात, एम्समधून डिस्चार्ज


अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन २२ एप्रिलला करोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. यानंतर २४ एप्रिलला त्याला दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. करोनामुक्त झाल्यानंतर ६१ वर्षीय अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला पुन्हा तिहार तुरुंगात पाठवल्याचं एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं.

छोटा राजनचा करोनाने मृत्यू झाल्याची बातमी काही दिवसांपूर्वी पसरली होती. पण ही अफवा असल्याचं नंतर तिहार तुरुंग प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. राजेंद्र सदाशिव निकाळजे उर्फ छोटा राजन यांच्या मृत्युची बातमी ही अफवा असल्याचं तिहार तुरुंगाचे महासंचालक संदीप गोयल यांनी त्यावेळी स्पष्ट केलं होतं.

'करोनाबाबत मुंबई, पुण्याकडून शिकावं', केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केले कौतुक

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला २०१५ मध्ये इंडोनेशियाने भारताच्या हवाली केलं होतं. यानंतर त्याला तिहार तुरुंगात ठेवण्यात आलं आहे.

vaccination : लसीच्या दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत असलेल्यांना प्राधान्य द्या, केंद्राचे राज्यांना आदेश

महत्वाचे लेख