पाटणा : राष्ट्रीय जनता दलाच्या अध्यक्षपदी सलग अकराव्या वेळेला लालूप्रसाद यादव यांची बिनविरोध निवड झाली. यादव सध्या चारा घोटाळा प्रकरणात तुरुंगवास भोगत आहेत. लालूप्रसाद यादव यांच्या नामांकनाचा अर्ज त्यांच्या वतीने त्यांचा मुलगा तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव यांनी पक्षाच्या मुख्यालयात सादर केला. दोघे जण आपल्यातील वैरभाव विसरून एकत्र आले होते. या वेळी पक्षाचे उपाध्यक्ष रघुवंशप्रसाद सिंह, राष्ट्रीय सरचिटणीस कांतीसिंह आणि प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह आदी नेते उपस्थित होते.
लालूप्रसाद बिनविरोध
राष्ट्रीय जनता दलाच्या अध्यक्षपदी सलग अकराव्या वेळेला लालूप्रसाद यादव यांची बिनविरोध निवड झाली यादव सध्या चारा घोटाळा प्रकरणात तुरुंगवास भोगत आहेत...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Dec 2019, 4:00 am