अ‍ॅपशहर

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

होळीच्या मुहूर्तावर मोदी सरकारनं केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना अनोखी भेट दिली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ६ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव मान्य करण्यात आला.

Maharashtra Times 23 Mar 2016, 2:29 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम union cabinet approves hike in da for central govt employees
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

होळीच्या मुहूर्तावर मोदी सरकारनं केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना अनोखी भेट दिली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ६ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव मान्य करण्यात आला.

नव्या निर्णयामुळं केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ११९ टक्क्यांवरून १२५ टक्क्यांवर पोहोचला आहे. हा भत्ता १ जानेवारी २०१६ पासून पूर्वलक्षीप्रभावानं लागू होणार आहे. याआधी सप्टेंबर २०१५मध्ये कर्मचाऱ्यांचा भत्ता ६ टक्क्यांनी वाढविण्यात आला होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज