अ‍ॅपशहर

अमित शहांना एम्समधून डिस्चार्ज, श्वास घेण्यास त्रास होत असल्याने झाले होते दाखल

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आज दिल्लीतील एम्समधून डिस्चार्ज देण्यात आला. गेल्या आठवड्यात त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. गेल्या महिन्यात त्यांना करोनाचा संसर्ग झाला होता.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Sep 2020, 6:51 pm
नवी दिल्लीः करोना संसर्गातून बरे झाल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होत असल्याने एम्समध्ये दाखल झालेल्या अमित शहा यांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात शनिवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास अति शहा यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Amit Shah
अमित शहांना एम्समधून डिस्चार्ज, श्वास घेण्यास त्रास होत असल्याने झाले होते दाखल


अमित शहा यांना एम्सच्या कार्डिओ न्यूरो टॉवरमध्ये दाखल केलं गेलं होतं. करोनातून बरे झाल्यावर (पोस्ट-कोविड उपचारांसाठी) एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. करोनातून बरे झाल्यावर त्यांना ३१ ऑगस्टला डिस्चार्ज देण्यात आला होता. यानंतर त्यांना श्वस घेण्यास त्रास होत होता. यामुळे गेल्या आठवड्यात शनिवारी त्यांना पुन्हा एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं.

बाबरी विध्वंस प्रकरणी फिर्यादीचे आवाहन; 'अडवाणी, जोशींसह सर्वांची निर्दोष मुक्तात करा आणि खटला संपवा'

देशाचं शीर झुकू देणार नाही, राज्यसभेत राजनाथ सिंहांची गर्जना

गेल्या महिन्यात २ ऑगस्टला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा करोना पॉझिटिव्ह आढळले होते. यानंतर त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. १४ ऑगस्टला त्यांची करोना टेस्ट निगेटिव्ह आली. पण चार दिवसांनंतर १८ ऑगस्टला त्यांना कोविडनंतरच्या काळजीसाठी एम्समध्ये दाखल केलं गेलं. त्या काळात त्यांनी रुग्णालयातूनही मंत्रालयाचं काम बघितलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज