अ‍ॅपशहर

नजमा हेपतुल्ला, सिद्देश्वरा यांचा राजीनामा

केंद्रीय मंत्रिमंडळाचा नुकताच विस्तार करण्यात आला असतानाच वयाची पंच्च्याहत्तरी पार केलेल्या केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री नजमा हेपतुल्ला यांच्यासह अवजड उद्योग राज्यमंत्री जी. एम. सिद्देश्वरा यांनी आपल्या पदाचा राजीनामा आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे सोपवला. राष्ट्रपतींनी दोन्ही मंत्र्यांचे राजीनामे तत्काळ प्रभावाने स्वीकारले आहेत.

Maharashtra Times 12 Jul 2016, 9:38 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम union ministers najma heptullah g m siddeshwara resign
नजमा हेपतुल्ला, सिद्देश्वरा यांचा राजीनामा


केंद्रीय मंत्रिमंडळाचा नुकताच विस्तार करण्यात आला असताना वयाची पंच्च्याहत्तरी पार केलेल्या केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री नजमा हेपतुल्ला यांच्यासह अवजड उद्योग राज्यमंत्री जी. एम. सिद्देश्वरा यांनी आपल्या पदाचा राजीनामा आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे सोपवला. राष्ट्रपतींनी दोन्ही मंत्र्यांचे राजीनामे तत्काळ प्रभावाने स्वीकारले आहेत.

नजमा हेपतुल्ला यांच्या राजीनाम्यानंतर केंद्रीय अल्पसंख्याक राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांना बढती देण्यात आली आहे. त्यांच्याकडे अल्पसंख्याक खात्याचा स्वतंत्र कार्यभार सोपवण्यात आला आहे तर बाबुल सुप्रियो यांच्याकडे सिद्देश्वरा यांच्याकडील अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम या खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. सुप्रियो हे नगरविकास व गृहनिर्माण राज्यमंत्री होते. त्या खात्यांच्या जबाबदारीतून त्यांना मुक्त करण्यात आले आहे.

दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारानंतर त्याच दिवशी पाच मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आले होते. त्या यादीत सिद्देश्वरा यांचेही नाव होते. मात्र नेमका त्याचदिवशी सिद्देश्वरा यांचा वाढदिवस होता. त्यानिमित्त त्यांनी मतदारसंघात मोठी सभाही आयोजित केली होती. त्यामुळे त्यांच्या विनंतीनुसार त्यांना राजीनामा देण्यासाठी भाजप नेतृत्वाने वेळ वाढवून दिली होती. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळात ७५ वर्षांवरील मंत्री नसावा, हे सूत्र कटाक्षाने पाळले आहे. त्याचाच भाग म्हणून ७६ वर्षीय नजमा यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आल्याचे बोलले जात आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज