अ‍ॅपशहर

unlock 5 guidelines : मल्टिप्लेक्स, चित्रपटगृह, स्विमिंग पूल सुरू होणार, पण अटिंसह

केंद्र सरकारने अनलॉक ५ साठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. करोना व्हायरसच्या प्रादुर्भाव पाहता सरकारने या सूचना जारी केल्या आहेत. आता १५ ऑक्टोबरपासून मल्टिप्लेक्स चित्रपटगृह, स्विमिंग पूल सुरू होणार आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Sep 2020, 8:53 pm
नवी दिल्लीः करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशातच केंद्र सकारने आता unlock 5 guidelines अनलॉक ५ साठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार येत्या १५ ऑक्टोबरपासून देशात मल्टिप्लेक्स चित्रपटगृह, स्विमिंग पूल सुरू होणार आहेत. पण सरकारने यासाठी काही अटी घातल्या आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम multiplexes
unlock 5 guidelines : मल्टिप्लेक्स, चित्रपटगृह, स्विमिंग पूल सुरू होणार


- चित्रपटगृह ५० टक्के क्षमतेने चालवण्याची परवानगी, खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी स्विमिंग पूल उघडणार

- अनलॉक - ५ च्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य सरकार १५ ऑक्टोबरनंतर शाळा-महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेऊ शकतात

- सामाजिक, क्रीडा, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रमांना यापूर्वीच जास्तीत जास्त १०० नागरिकांच्या उपस्थितीत आयोजित करण्याची परवानगी देण्यात आली आहे

- कंटेन्ट झोनमधील कठोर लॉकडाउन ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आला आहे

- राज्य सरकारांनी कंटेन्मेंट झोनच्या बाहेर स्थानिक पातळीवर लॉकडाउन घोषित करू नये. आंतरराज्य आणि राज्यांतर्गत वाहतुकीवर बंदी नाही

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज