बीजिंग : चीनने गुरुवारी मानवरहित युद्धनौकेचे अनावरण केले. युद्धनौका पूर्णपणे सज्ज असल्याचा दावा नौका बनविणाऱ्या कंपनीने केला आहे. 'चायना शिपबिल्डिंग इंडस्ट्री कॉर्पोरेशन'ने ही युद्धनौका बनवली आहे. ही युद्धनौका १५ मीटर लांब आणि वजन २० टन इतके आहे. एका अज्ञात ठिकाणी नौकेचा अनावरण सोहळा झाला, अशी माहिती चीनची सरकारी वृत्तसंस्था 'ग्लोबल टाइम्स'ने दिली आहे. 'ड्रोन शिप' युद्धासाठी प्राथमिक पातळीवर सज्ज झाल्याचेही म्हटले आहे.
चीनची मानवरहित युद्धनौका
चीनने गुरुवारी मानवरहित युद्धनौकेचे अनावरण केले युद्धनौका पूर्णपणे सज्ज असल्याचा दावा नौका बनविणाऱ्या कंपनीने केला आहे...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Aug 2019, 4:00 am