अ‍ॅपशहर

बेनेट विद्यापीठाला राज्यपालांची मान्यता

उत्तर प्रदेशात ग्रेटर नोएडामध्ये सुरू होणाऱ्या बेनेट विद्यापीठाला राज्यपाल राम नाईक यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे विद्यापीठात याच सत्रात प्रवेश सुरू होऊ शकतात.या सत्रात प्रवेश होण्याची आवश्यकता लक्षात घेता आपण मंत्रिमंडळाच्या प्रस्तावाचा अभ्यास केल्यानंतरच अध्यादेशाला मंजुरी दिली, असे नाईक यांनी सांगितले.

Maharashtra Times 8 Aug 2016, 9:21 am
यंदापासूनच इंजिनीअरिंग व एमबीएचे अभ्यासक्रम
महाराष्ट्र टाइम्स.कॉम up government gives nod for bennett university
बेनेट विद्यापीठाला राज्यपालांची मान्यता


एनबीटी वृत्त, लखनऊ

उत्तर प्रदेशात ग्रेटर नोएडामध्ये सुरू होणाऱ्या बेनेट विद्यापीठाला राज्यपाल राम नाईक यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे विद्यापीठात याच सत्रात प्रवेश सुरू होऊ शकतात.या सत्रात प्रवेश होण्याची आवश्यकता लक्षात घेता आपण मंत्रिमंडळाच्या प्रस्तावाचा अभ्यास केल्यानंतरच अध्यादेशाला मंजुरी दिली, असे नाईक यांनी सांगितले. बेनेट विद्यापीठ ग्रेटर नोएडा उत्तर प्रदेश अध्यादेश २०१६ राज्य मंत्रिमंडळात मंजूर झाल्यानंतर ५ ऑगस्टला राज्यपालांच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आले होते.बेनेट विद्यापीठात यंदा इंजिनीअरिंग आणि एमबीएचे अभ्यासक्रम सुरू होणार आहेत. या विद्यापीठातील अभ्यासक्रमांची रचना संशोधनावर आधारित करण्यात आली आहे. अभ्यासक्रमची रचना करताना त्या क्षेत्रातील करिअरसंधींचाही विचार करण्यात आला आहे. बेनेट विद्यापीठात विद्यापीठीय शिक्षणाबरोबरच तरुणांमध्ये सॉफ्ट स्किल विकसित करण्यावरही भर देण्यात येणार आहे.

जॉर्जिया टेक, बाबसन, ईडीएक्स आणि जॉन्सन कॉर्नेल विद्यापीठांसारख्या जगभरातील ख्यातनाम विद्यापीठे व शिक्षणसंस्थांबरोबर बेनेट विद्यापीठाने करार केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळणार आहे.

या पद्धतीच्या शिक्षण संस्था सुरू झाल्यामुळे राज्यातील तरुणांसाठी शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर अधिक चांगल्या रोजगारसंधीही त्यांना मिळू शकतील.
-अखिलेश यादव, मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज