अ‍ॅपशहर

युपीत आणखी एक धक्कादायक घटना; सामूहिक बलात्कारानंतर दलित मुलीचे पाय तोडले

उत्तर प्रदेशात महिलांवरील अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. हाथरसमधील तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना ताजी असतानाच आणखी एका दलित मुलीची बलात्कार करून हत्या केल्याची घटना समोर आलीय. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केलीय.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Oct 2020, 9:21 am
बलरामपूरः उत्तर प्रदेशच्या हाथरस येथील दलित मुलीवरील सामूहिक बलात्काराच्या घटनेच्या धक्क्यांतर नागरिक सावरलेलेही नसताना युपीतील बलरामपूरमध्ये आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आणखी एका २२ वर्षीय दलित मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याचं समोर आलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rape
युपीत आणखी एक सामूहिक बलात्काराची घटना, हत्येप्रकरणी दोघांना अटक ( प्रातिनिधिक फोटो )


दोन मित्रांनी मैत्रीच्या बहाण्याने दलित मुलीला बोलावून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. हे घृणास्पद कृत्य केल्यानंतर दोन्ही आरोपींनी तिची कंबर आणि पाय मोडले गंभीर अवस्थेत असलेल्या या मुलीला रिक्षातून घरी पाठवले. नंतर तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. तिला आधी इंजेक्शन दिलं गेलं आणि मग तिच्यावर आत्याचार केला गेला, असा पीडित मुलीच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. प्रचंड वेदना होत आहेत. आता मी वाचू शकणार नाही, असं गंभीर अवस्थेत आलेल्या मुलीने मृत्युपूर्वी म्हणाल्याचं कुटुंबीयांनी सांगितलं.

या प्रकरणातील एका आरोपीचे नाव शाहिद आहे. तर दुसऱ्या आरोपीचं नाव साहिल आहे. दोघेही गैंसडीचे राहणारे आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिलीय.

या प्रकरणात तातडीने कारवाई करून दोन्ही आरोपींना अटक केल्याचं बलरामपूर पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणात पीडितेचे हात, पाय आणि कंबर तोडल्याची बाब चुकीची नाही, असं पोलिसांनी म्हटले आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये याची पुष्टी झालेली नाही.

पीडित मुलगी महाविद्यालयीन विद्यार्थिनी आहे. तिच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरोधात बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गंसडी कोतवाली परिसरातील आहे. बी-कॉमच्या दुसऱ्या वर्षाच्या प्रवेशासाठी पचपेडव्याच्या महाविद्यालयात गेला होती.

सायंकाळी एका रिक्षाचालकाने मुलीला बेशुद्ध अवस्थेत तिच्या घराजवळ सोडलं. कुटुंबीयांनी मुलीला रूग्णालयात तातडीने दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण वाटेतच तिचा मृत्यू झाला. महाविद्यालयातून परतत असताना मुलीचं अपहरण करण्यात आलं आणि गंसडी शहरातील एका खोलीत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला गेला, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

हाथरस पीडितेच्या वडिलांशी योगी बोलले, सरकारी नोकरीचं दिलं आश्वासन

हाथरस गँगरेपः 'थोडा धीर धरा, योगी सरकारमध्ये गाडी कधीही पलटी होते'

ज्या खोलीत पीडितवर सामूहिक बलात्कार झाला ती एका किरणा दुकानाची मागची बाजू आहे. किराणा दुकान चालवणारा तरुणच या घटनेचा मास्टरमाइंड असल्याचं सांगितलं जातंय. सामूहिक बलात्कारानंतर मुलीची प्रकृती बिघडल्याने आरोपींनी एका खासगी डॉक्टराला तिच्यावर उपचार करण्यासाठी बोलावलं होतं. पण डॉक्टराने खोलीत एकटं पडलेलं पाहून तिच्यावर उपचार करण्यास नकार दिला आणि तिच्या घरच्यांना कळवण्यास सांगतिलं.

हाथरस गँगरेपः दलिताची मुलगी होती म्हणून प्रकरण दाबणार का? पीडितेच्या आईचा संतप्त सवाल

या प्रकरणी पोलिसांनी मृतदेहाचं पोस्टमॉर्टम केलंय आणि दोन्ही तरुणांना अटक केलीय.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज