अ‍ॅपशहर

यूपीत सप, काँग्रेस, बसपला ट्रिपल तलाक मिळेल!

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री अखिलेश यादव एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोघांनी विकासाच्या नावाखाली जनतेला फसवले आहे. त्यामुळे, येत्या निवडणुकीत उत्तर प्रदेशची जनता समाजवादी पक्ष, काँग्रेस आणि बहुजन समाज पक्षाला ‘ट्रिपल तलाक’ देतील,’ अशा शब्दांत ‘एमआयएम’चे अध्यक्ष असदुद्दिन ओवैसी यांनी विरोधी पक्षांवर टीका केली.

Maharashtra Times 5 Feb 2017, 9:46 am
लखनौ : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री अखिलेश यादव एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोघांनी विकासाच्या नावाखाली जनतेला फसवले आहे. त्यामुळे, येत्या निवडणुकीत उत्तर प्रदेशची जनता समाजवादी पक्ष, काँग्रेस आणि बहुजन समाज पक्षाला ‘ट्रिपल तलाक’ देतील,’ अशा शब्दांत ‘एमआयएम’चे अध्यक्ष असदुद्दिन ओवैसी यांनी विरोधी पक्षांवर टीका केली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम up people will give tripple talaq to sp congress and bsp
यूपीत सप, काँग्रेस, बसपला ट्रिपल तलाक मिळेल!


‘उत्तर प्रदेशातील मुस्लिमांनी राजीव गांधी, मुलायमसिंह यादव, अखिलेश यादव यांना नेता म्हणून स्वीकारले. परंतु, या नेत्यांनी मुस्लिम समाजाचा विश्वासघात केला. समाजवादी पक्षाने दहशतवादाच्या खोट्या आरोपांखाली तुरुंगात असलेल्या मुस्लिम तरुणांची सुटका करण्याचे आश्वासन दिले होते. पण काय केले?,’ असा सवाल ओवैसी यांनी केला. ‘ट्रिपल तलाक’च्या मुद्द्यावर ओवैसी म्हणाले, ‘मोदी सरकारला ‘ट्रिपल तलाक’चा मुद्दाच का ऐरणीवर आणावा वाटतो? गुजरात दंगलीतील झकिया झाकरी, दादरी दंगलीतील अखलाकची आई यांच्याबाबत मोदी का बोलत नाहीत? हे सरकार असे मुद्दे ऐरणीवर आणून आपल्या आश्वासनांपासून पळ काढत आहे,’ असेही ओवैसी म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज