अ‍ॅपशहर

पाकिस्तानला एकटे पाडा!

‘काश्मीर हल्ल्यातील दहशतवादी प्रशिक्षित होते, तसेच त्यांच्याकडे अत्याधुनिक स्फोटके होती. यामागे पाकिस्तानचाच हात असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. पाकिस्तान हे एक दहशतवादी राष्ट्र असून आंतरराष्ट्रीय समुदायाने पाकिस्तानला एकाकी पाडण्याची गरज आहे,’ असा घणाघात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केला.

Maharashtra Times 19 Sep 2016, 2:57 am
वृत्तसंस्था, श्रीनगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम uri terror attack pakistan a terrorist state and should be isolated says rajnath singh
पाकिस्तानला एकटे पाडा!


‘काश्मीर हल्ल्यातील दहशतवादी प्रशिक्षित होते, तसेच त्यांच्याकडे अत्याधुनिक स्फोटके होती. यामागे पाकिस्तानचाच हात असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. पाकिस्तान हे एक दहशतवादी राष्ट्र असून आंतरराष्ट्रीय समुदायाने पाकिस्तानला एकाकी पाडण्याची गरज आहे,’ असा घणाघात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केला. काश्मीरमधील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी त्यांनी तातडीची बैठक बोलावली. या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, केंद्रीय गृहसचिव तसेच लष्कराचे उच्चपदस्थ अधिकारी सहभागी झाले होते. काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती तसेच राज्यपाल एन. एन. व्होरा यांच्याशी त्यांनी चर्चा केली. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राजनाथ यांनी आपला रशिया व अमेरिकेचा दौरा पुढे ढकलला.

पर्रीकर काश्मीरमध्ये

या हल्ल्याची माहिती मिळताच केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर गोवा दौरा मध्येच सोडून काश्मीरमध्ये दाखल झाले. लष्करप्रमुख जनरल दलबिरसिंह सुहाग यांनीही तातडीने काश्मीर गाठले.

राजकीय पक्षांकडून निषेध

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी तसेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी या हल्ल्याचा निषेध केला.

कारवाईचा पर्याय खुला

पाकिस्तानविरोधात लष्करी कारवाई करण्याचा पर्याय आपल्यासमोर खुला आहे. या हल्ल्याला उत्तर म्हणून गरज पडल्यास आपण तिकडच्या काही भागांवर हल्ला करू शकतो, असे मत निवृत्त लेफ्टनंट जनरल बी. एस. जस्वाल यांनी व्यक्त केले. त्यांनी कितीही हल्ले केले तरी आपण त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणार नाही, याची खात्री असल्याने पाकिस्तानकडून वारंवार असे प्रकार घडतात, असे मत निवृत्त मेजर गौरव आर्य यांनी मांडले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज