अ‍ॅपशहर

‘विज्ञानप्रसारासाठी देशी भाषा वापरावी’

‘तरुणांमध्ये विज्ञानविषयक आवड निर्माण करण्यासाठी आणि वैज्ञानिक माहिती प्रसारित करण्यासाठी देशी भाषांचा वापर करा,’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी वैज्ञानिकांना केले. ‘भाषा ही अडथळा न बनता ती साह्यकारी झाली पाहिजे,’ अशी अपेक्षाही पंतप्रधानांनी व्यक्त केली. अल्बर्ट आइनस्टाइन यांच्यासमवेत काम केलेले आणि बोसॉन कणांचा शोध लावणारे प्रा. सत्येंद्रनाथ बोस यांच्या १२५ व्या जयंतीच्या पूर्वावलोकन कार्यक्रमात पंतप्रधान व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले.

Maharashtra Times 2 Jan 2018, 12:22 am
वृत्तसंस्था, कोलकता
महाराष्ट्र टाइम्स.कॉम use vernacular languages in science communication pm narendra modi to scientists
‘विज्ञानप्रसारासाठी देशी भाषा वापरावी’

‘तरुणांमध्ये विज्ञानविषयक आवड निर्माण करण्यासाठी आणि वैज्ञानिक माहिती प्रसारित करण्यासाठी देशी भाषांचा वापर करा,’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी वैज्ञानिकांना केले. ‘भाषा ही अडथळा न बनता ती साह्यकारी झाली पाहिजे,’ अशी अपेक्षाही पंतप्रधानांनी व्यक्त केली. अल्बर्ट आइनस्टाइन यांच्यासमवेत काम केलेले आणि बोसॉन कणांचा शोध लावणारे प्रा. सत्येंद्रनाथ बोस यांच्या १२५ व्या जयंतीच्या पूर्वावलोकन कार्यक्रमात पंतप्रधान व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले.

‘सामान्यांच्या फायद्यासाठी आणि त्यांच्या सामाजिक-आर्थिक गरज भागविण्यासाठी संशोधकांनी काम करणे आवश्यक आहे, तरुणांमध्ये विज्ञानाची आवड विकसित करण्यासाठी आणि विज्ञान त्यांना सहजपणे समजण्यासाठी विज्ञानविषयक माहितीचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होणे आवश्यक आहे. अशा गोष्टीत भाषा हा अडसर बनता कामा नये, उलट ती साह्यकारी झाली पाहिजे. एखाद्या संशोधनाचा सामान्य लोकांच्या जगण्यावर सकारात्मक परिणाम किती झाला, याचे मूल्यमापन होणे हे आजच्या जगात गरजेचे आहे,’ असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

‘प्रत्येक शास्त्रज्ञाने किमान एका मुलाला शिकवावे, या प्रकारे किमान एक लाख मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करता येईल. २०१७मध्ये प्रत्येक भारतीयाने आपल्या पूर्वजांच्या कल्पनेतील भारत घडविण्याची शपथ घेतली होती. यासाठी सारी शक्ती पणाला लावून काम केले पाहिजे. २०१८ हे जलछाया वर्ष असणार आहे. प्रत्येक शास्त्रज्ञाने आपली कल्पकता आणि संशोधन त्या दृष्टीने वापरून भारताला सक्षम करावे,’ अशी अपेक्षा मोदींनी व्यक्त केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज