अ‍ॅपशहर

युपी पुन्हा हादरलं, दुर्गा पूजेवरून परणाऱ्या तरुणीचं अपहरण करून सामूहिक बलात्कार

हाथरसमधील सामूहिक बलात्काराच्या घटनेने युपी हादरलं. यानंतर या घटनेची सीबीआय चौकशी होतेय. पण त्यानंतरही युपीतील महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटना थांबलेल्या नाहीत. दुर्गा पूजेला गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Oct 2020, 2:31 am
नवी दिल्लीः उत्तर प्रदेशात महिलांवर अत्याचार सुरूच आहेत. आता महोबा येथील १९ वर्षांच्या तरुणीवर सामूहिक बलात्काराची ( gang raped ) घटना समोर आली आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rape
युपी पुन्हा हादरलं, दुर्गा पूजेवरून परणाऱ्या तरुणीचं अपहरण करून सामूहिक बलात्कार


नवरात्रीच्या कार्यक्रमात दुर्गा पूजेनंतर ही तरुणी आपल्या घरी जात होती. यानंतर तीन तरुणांनी रस्त्यावरून तिचं अपहरण केलं आणि निर्जन जागी नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ही घटना बुधवारी रात्रीची आहे.

पानवाडी भागात बलात्काराची घटना समोर आली आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई केली असून तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक अरुण कुमार श्रीवास्तव यांनी दिली.

आरोपी तरुणीला आपल्या घरामागील एका निर्मनुष्य ठिकाणी नेलं आणि तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी बुधवारी रात्रीच आरोपींना अटक करण्यात आली. पीडित तरुणीला वैद्यकीय तपासणी पाठवण्यात आलं आहे. याप्रकरणी पोलिस तपास करत आहेत.

'प्लाझ्मा ही जादूची गोळी नाही, वेळेवर उपचार हाच करोनावर उपाय'

'करोनावरील लस सर्वांना नाही, फक्त गरीबांनाच मिळणार मोफत'

पंजाबमध्ये ६ वर्षाच्या मुलीवर बलात्कार

पंजाबच्या होशियारपूरमध्ये एका ६ वर्षाच्या मुलीवर कथित बलात्कार आणि नंतर तिची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या भयंकर घटनेत गावातील एका घरात मुलीचा अर्धा जळालेला मृतदेह आढळून आला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज