अ‍ॅपशहर

विद्यार्थ्यांना बसने सोडले, राजस्थानने यूपीला दिले ३६.३६ लाखांचे बिल

लॉकडाउनमुळे राजस्थानातील कोटा येथे अडकलेल्या उत्तर प्रदेशातील विद्यार्थ्यांना राजस्थान सरकारने उत्तर प्रदेशात बसेसद्वारे सोडले. राजस्थान सरकारने याचे ३६ लाख ३६ हजार इतके भाडे आकारले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 May 2020, 2:30 pm
नवी दिल्ली: काँग्रेसच्या नेतृत्वातील राजस्थान सरकारने विद्यार्थ्यांना कोटा येथून उत्तर प्रदेशात नेणाऱ्या बसेससाठी ३६ लाखांहून अधिक रुपयांचे भाडे आकारले. उत्तर प्रदेश सरकारने हे भाडे शुक्रवारी चुकते केले. राजस्थान सरकारने हे बिल बुधवारी उत्तर प्रदेश सरकारला पाठवले होते. या प्रकऱणावरून उत्तर प्रदेश सरकारने राजस्थान सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम राजस्थानने विद्यार्त्यांकडून आकारले बसभाडे


३६ .३६ लाख रुपयांचे भाडे मागणाऱ्या राजस्थान सरकारवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे माध्यम सल्लागार मृत्युंजय कुमार यांनी टीकास्त्र सोडले आहे. हा राजस्थान सरकारचा अमानवीय चेहरा असल्याचे ते म्हणाले. लॉकडाउनमुळे राजस्थानातील कोटा येथे अडकलेल्या उत्तर प्रदेशातील विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी सोडण्याचा निर्णय एप्रिल महिन्यात घेतला होता, अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाचे संचालक राज शेखर यांनी सांगितले.

कोटा येथे फसलेल्या उत्तर प्रदेशातील विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी आम्ही बसेस उपलब्ध केल्या होत्या, मात्र आम्हाला अतिरिक्त बसेसची आवश्यकता होती असेही राज शेखर म्हणाले. कोटा येथे उपलब्ध असलेल्या राजस्थान परिवहन महामंडळाच्या बसेस या विद्यार्थ्यांना आग्रा आणि मथुरा येथे सोडण्यासाठी तयार करण्यात आल्या होत्या.या बसेसचे सर्व भाडे उत्तर प्रदेश परिवहन महामंडळाने चुकवले. एप्रिल महिन्यात उत्तर प्रदेशातील हजारो विद्यार्थ्यांना कोटा येथून त्यांच्या उत्तर प्रदेशातील घरी पोहोचवण्यात आले होते. हे सर्व विद्यार्थी राजस्थानमधील कोटा येथे स्पर्धा परीक्षांची तयारी करत होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज