अ‍ॅपशहर

चलान फाडण्याची धमकी, इंजिनीअरचा भीतीनं मृत्यू

नव्या मोटार वाहन कायद्यानुसार, नियम मोडल्यास आकारण्यात येणाऱ्या जबर दंडाचा धसका वाहनधारकांनी घेतला आहे. अशीच एक दुर्दैवी घटना नोएडातील इंदिरापुरममध्ये घडली आहे. वाहतूक पोलिसानं चलान फाडण्याची धमकी दिल्यानं इंजिनीअर तरुणाचा हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू झाला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Sep 2019, 10:31 am
नोएडा: नव्या मोटार वाहन कायद्यानुसार, नियम मोडल्यास आकारण्यात येणाऱ्या जबर दंडाचा धसका वाहनधारकांनी घेतला आहे. अशीच एक दुर्दैवी घटना नोएडातील इंदिरापुरममध्ये घडली आहे. वाहतूक पोलिसानं चलान फाडण्याची धमकी दिल्यानं इंजिनीअर तरुणाचा हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू झाला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम traffic police


मूलचंद शर्मा हे मुलगा गौरव याच्यासोबत रविवारी संध्याकाळी इंदिरापुरमकडे जात होते. गौरव कार चालवत होता. संध्याकाळी सहा वाजता एनएच ९वर इंदिरापुरमजवळ वाहतूक पोलीस उभे होते. त्यांनी कार थांबवायला सांगितली. तसंच कारवर दंडुके मारण्यास सुरुवात केली. गौरवनं पोलिसांच्या या कृत्यावर नाराजी व्यक्त केली. त्यावर पोलिसांनी चलान फाडण्याची आणि कार जप्त करण्याची धमकी देत फोटो काढण्यास सुरुवात केली. या भीतीनं गौरव चक्कर येऊन बेशुद्ध पडला.

रस्त्यावरून जाणाऱ्या काही जणांनी गौरवला फोर्टिस रुग्णालयात नेले. गौरवची प्रकृती गंभीर होती. त्याला पुढील उपचारासाठी अन्य रुग्णालयात घेऊन जावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यानंतर गौरवला कैलाश रुग्णालयात नेले. तेथे तपासणीनंतर गौरवला मृत घोषित केले, असं गौरवचे वडील मूलचंद शर्मा यांनी सांगितलं. कुटुंबीयांनी तक्रार दिल्यास गुन्हा दाखल करून निष्पक्ष चौकशी केली जाईल आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक वैभव कृष्ण यांनी दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज