अ‍ॅपशहर

Ayodhya Bomb Threat: अयोध्येत बॉम्बस्फोट घडवण्याच्या धमकीने खळबळ; 'या' राज्यातून कॉल

Ayodhya Bomb Threat: उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीचे पडघम वाजू लागले असतानाच मथुरा आणि अयोध्या केंद्रस्थानी आले असून अयोध्येत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम | 3 Dec 2021, 8:04 am

हायलाइट्स:

  • अयोध्येत साखळी बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी.
  • गुजरातमधून फोन आल्याचे तपासात झाले स्पष्ट.
  • खबरदारी म्हणून अयोध्येत बंदोबस्त वाढवला.
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ayodhya
अयोध्येत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी. (फाइल फोटो)
अयोध्या: उत्तर प्रदेशातील सर्वाधिक संवेदनशील असलेल्या अयोध्येत एका धमकीच्या फोनमुळे खळबळ उडाली आहे. अयोध्येत साखळी बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी फोनकॉलच्या माध्यमातून देण्यात आली असून पोलिसांकडून संपूर्ण अयोध्येत तातडीने शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. अयोध्येत येणारे सर्व रस्ते, धर्मशाळा, प्रमुख मंदिरे आणि हॉटेल या ठिकाणी कसून तपासणी करण्यात येत आहे. अयोध्यानगरीसह संपूर्ण जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. ( Ayodhya Bomb Threat Latest News )
वाचा: ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव; 'या' राज्यात आढळले २ रुग्ण

अयोध्या जिल्हा पोलिसांकडून या माहितीला दुजोरा देण्यात आला आहे. अज्ञात व्यक्तीने ईमर्जन्सी नंबर ११२ वर फोन केला आणि अयोध्येत साखळी बॉम्बस्फोट घडवण्याची आणि राम मंदिर उडवून देण्याची धमकी दिली, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. हा फोन करणाऱ्याला हुडकण्यात आले असून हा तरुण गुजरातमधील अहमदाबाद येथील आहे व त्याची अधिक चौकशी करण्यात येत असल्याचेही पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.

वाचा:ओमिक्रॉन डेल्टापेक्षा पाचपट घातक!; केंद्राने दिला 'हा' धोक्याचा इशारा

अयोध्या हा अत्यंत संवेदनशील जिल्हा आहे. त्यामुळेच बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी आल्यानंतर उत्तर प्रदेश पोलीस सतर्क झाले आहेत. अयोध्येत लगेचच पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. अयोध्येकडे येणाऱ्या सर्व मार्गांवर कसून तपासणी करण्यात येत आहे. रेल्वे स्टेशन्स, बस स्टँड, हॉटेल्स, धर्मशाळा याठिकाणी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. अयोध्यानगरीत येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यात येत आहे. त्याचवेळी बॉम्ब शोधक आणि नाशक पथकासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून अद्याप अयोध्यानगरी तसेच जिल्ह्यात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही, असेही सांगण्यात आले आहे.

- अयोध्येतील राम जन्मभूमी येथे ब्लॅक कॅट कमांडोजना अधिक सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.

- स्थानिक पोलीस आणि सीएपीएफच्या जवानांनी शहरातील यलो झोनमध्ये रूटमार्च केला.

- अयोध्येतील सुरक्षा व्यवस्थेचे नियंत्रण वरिष्ठ पोलीस अधीक्षकाकडे सोपवण्यात आले आहे.

वाचा: ओमिक्रॉनमुळे भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार?; केंद्राकडून मिळाले 'हे' उत्तर

महत्वाचे लेख