अ‍ॅपशहर

उत्तराखंड: बस नदीत कोसळून २२ ठार

उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे पुन्हा एकदा चारधाम यात्रेकरूंवर काळाचा घाला पडला आहे. यात्रेकरूंची बस नदीत कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात २२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ८ जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Maharashtra Times 23 May 2017, 11:14 pm
मटा ऑनलाइन वृत्त । उत्तरकाशी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम uttarkashi bus accident 22 bodies recovered so far 8 injured admitted to hospital
उत्तराखंड: बस नदीत कोसळून २२ ठार


उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे पुन्हा एकदा चारधाम यात्रेकरूंवर काळाचा घाला पडला आहे. यात्रेकरूंची बस नदीत कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात २२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ८ जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातग्रस्त बसमध्ये ३० यात्रेकरू होते. हे सर्वजण गंगोत्रीचं दर्शन घेऊन परतत असतानाच त्यांच्या बसला भीषण अपघात झाला. सर्व यात्रेकरू मध्य प्रदेशमधील इंदूर येथील रहिवासी होते.

मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी अपघाताबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. मृतांच्या वारसांना त्यांनी प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत जाहीर केली असून जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत राज्य सरकार देणार आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही उत्तरकाशी अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.


#WATCH: Rescue ops by ITBP personnel near Uttarakhand's Dharasu, where bus carrying 29 pilgrims from MP, fell into river;22 bodies recovered pic.twitter.com/I54Ucd6op3 — ANI (@ANI_news) May 23, 2017

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज