अ‍ॅपशहर

रेल्वे स्थानकांवर परतणार देशी बाज; रेल्वे मंत्र्यांनी केली 'ही' घोषणा

देशातील सर्वच रेल्वे स्थानकांमध्ये आता प्लास्टिक कपांऐवजी कुल्हडमध्येच चहा मिळणार आहे. रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी ही घोषणा केली. यामुळे पर्यावरणाचा मोठा फायदा होणार असल्याचे ते म्हणाले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Nov 2020, 7:41 pm
जयपूर: केंद्र सरकार रेल्वे स्थानके (Railway Stations) प्लास्टिकमुक्त करण्याची तयारी करत आहे. याचाच एक भाग म्हणून आता तुम्ही रेल्वे स्थानकांवर प्लास्टिकच्या कपात चहा पिऊ शकणार नाही. रेल्वे स्थानकांवर आता देशी बाज पुन्हा पाहायला मिळणार आहे. याचे कारण म्हणजे आता प्रवासी रेल्वे स्थानकांवर कुल्हडमध्ये चहाचा (Tea in Kulhad) आस्वाद घेणार आहेत. रेल्वे मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी रविवारी ही घोषणा केली. येणाऱ्या काळात देशातील प्रत्येक रेल्वे स्थानकावर प्लास्टिकमुक्त कुल्हडमध्येच चहा मिळणार आहे, असे गोयल म्हणाले. रेल्वे मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, देशात आज सुमारे ४०० रेल्वे स्थानकांवर कुल्हडमध्येच चहा मिळत आहे. मात्र भविष्यात देशातील प्रत्येक रेल्वे स्थानकावर कुल्हडमध्ये चहा मिळेल अशी सरकारची योजना आहे. हे प्लास्टिकमुक्त भारतातील रेल्वेचे योगदान असणार आहे, असे गोयल म्हणाले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम रेल्वे स्थानकावर कुल्हडमध्ये चहा मिळणार


या मुळे लाखो बंधु-भगिनींना रोजगार मिळेल असे गोयल म्हणाले. गोयल यांनी राजस्थानातील अलवर येते ढिगावडा रेल्वे स्थानकावर ढिगावडा-बांदीकुई रेल्वे विभागात रेलमार्ग विद्युतीकरणाचे लोकार्पण केले. त्यावेळी ते बोलत होते.

एक काळ असा होता की रेल्वे स्थानकात केवळ कुल्हडमध्येच चहा मिळत असे. जेव्हा सन २०१४ मध्ये केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आले तेव्हापर्यंत रेल्वे स्थानकांमधून कुल्हड गायब झाले होते. त्यांच्या जागी प्लास्टिकच्या कपातून चहा द्यायला सुरुवात झाली, असे गोयल म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा- Farmers Protest Latest Update: शेतकऱ्यांनी केंद्राचा प्रस्ताव फेटाळला, बुराडी मैदानाला म्हटले खुला तुरुंग

रेल्वेमत्री पीयूष गोयल यांनी बोलताना पुढे सांगितले की, खादी ग्रामोद्योग विभागाच्या लोकांनी रेल्वेच्या सहकार्याने या कामाला गती दिली. मी आता कुल्हडमध्ये चहा पीत होतो आणि खरेतर कुल्हडमधील चहाची चव काही औरच आहे. पर्यावरणाला देखील याचा फायदा होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २०१४ मध्ये सत्तेत आले आणि तेव्हा पासून ते लोकांच्या आरोग्याबाबत चिंतीत आहेत. दरम्यान देशभरातील रेल्वे लाइचे शंभर टक्के विद्युतीकरण केले जाईल असेही गोयल म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा- रोंहिग्या मुस्लिमांच्या प्रश्नावर अमित शहा भडकले, म्हणाले...
क्लिक करा आणि वाचा- हैदराबादचा महापौर भाजपचाच होणार; रोड शोनंतर शहांचे वक्तव्य

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज