अ‍ॅपशहर

लाचखोर डॉक्टराने गिळली दोन हजाराची नोट

लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याची कुणकूण लागताच एका पशुवैद्यकीय डॉक्टरने दोन हजार रुपयांची नोट गिळल्याची आश्चर्यकारक घटना घडली आहे. दोन हजाराची नोट गिळणाऱ्या या डॉक्टरला दवाखान्यात नेण्यात आले असून ही नोट मिळविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Mar 2018, 1:45 pm
अहमदाबाद : लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याची कुणकूण लागताच एका पशुवैद्यकीय डॉक्टरने दोन हजार रुपयांची नोट गिळल्याची आश्चर्यकारक घटना घडली आहे. दोन हजाराची नोट गिळणाऱ्या या डॉक्टरला दवाखान्यात नेण्यात आले असून ही नोट मिळविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम veterinary doctor swallows rs 2000 note to foil acb trap
लाचखोर डॉक्टराने गिळली दोन हजाराची नोट


पाटण येथील एका पशुवैद्यकीय डॉक्टरने एका व्यक्तीकडे दोन हजाराची लाच मागितली होती. या व्यक्तीने त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) माहिती दिली. त्यानुसार एसीबीने शुक्रवारी सापळा रचला. संबंधित व्यक्तीने या डॉक्टरला लाच म्हणून दोन हजार रुपये दिले आणि तिथून निघून गेला. मात्र यात काही तरी काळंबेरं असावं असा संशय या डॉक्टरला आला आणि एसीबीचे अधिकारी येण्याआधीच त्याने ही दोन हजाराची नोट गिळून टाकली.

दरम्यान, एसीबीने त्याला ताब्यात घेतले असून रुग्णालयात दाखल केले आहे. 'भ्रष्टाचाराच्या प्रकरणात लाच म्हणून दिलेली रक्कम अत्यंत महत्त्वाची असते. कारण आरोपी लाच म्हणून ज्या नोटा घेतो, त्याचा नंबर आमच्याकडे आधीच नोंदलेला असतो. पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी आरोपी नेहमीच खटपट करतात. त्यामुळे हे काही पहिलेच उदाहरण नाही, मात्र ही घटना अनोखी आहे,' असं एसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज