अ‍ॅपशहर

Una:उना कांड घडलं तिथंच बौद्ध विहार बांधणार

उना येथे ज्या ठिकाणी दलितांना मारहाण करण्यात आली. त्या ठिकाणी बौद्ध विहार बांधण्यात येणार आहे. त्यासाठी व्यापक मोहिम हाती घेण्यात येणार असल्याचं ऊना येथील पीडित दलितांनी सांगितलं.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 May 2018, 3:13 pm
अहमदाबाद: उना येथे ज्या ठिकाणी दलितांना मारहाण करण्यात आली. त्या ठिकाणी बौद्ध विहार बांधण्यात येणार आहे. त्यासाठी व्यापक मोहिम हाती घेण्यात येणार असल्याचं ऊना येथील पीडित दलितांनी सांगितलं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम victim family of gujarats una announced to make lord buddha temple at flogging site
Una:उना कांड घडलं तिथंच बौद्ध विहार बांधणार


दोन वर्षापूर्वी काही गोरक्षकांनी उना येथील दलितांना अमानूषपणे मारहाण केली होती. या घटनेचे संपूर्ण देशभर पडसाद उमटले होते. या घटनेमुळे संतप्त झालेल्या शेकडो दलितांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारला. बुद्ध पौर्णिमेचं औचित्य साधून त्यांनी बौद्ध धर्मात प्रवेश केला. हिंदू धर्मात सन्मानानं वागणूक दिली जात नव्हती. हिंदुंनी आम्हाला कधीच त्यांचं मानलं नाही. त्यामुळे आम्ही बौद्ध धर्म स्वीकारल्याचं धर्मांतरीत दलितांनी सांगितलं.

उना कांडातील पीडित रमेश आणि वशरामचे वडील बालू सरवइया बौद्ध विहार बांधण्यासाठी पुढाकार घेणार आहेत. संपूर्ण गुजरातमध्ये जे लोक जातीय अत्याचाराने पीडित आहेत. त्यांच्याकडून मंदिरासाठी एक वीट दान म्हणून घेण्यात येणार असून या विटांचं विहार बांधण्यात येणार आहे. येणाऱ्या पिढिला या विहारामागचा इतिहास कळावा म्हणून हे करण्यात येणार असल्याचं या दोघांनी स्पष्ट केलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज