अ‍ॅपशहर

राहुलशी हस्तांदोलन करण्यास अब्दुल्ला विसरले

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या फजितीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांना हस्तांदोलन करण्यासाठी ते उठून उभे राहिले, पण अब्दुल्ला त्यांच्याकडे न पाहताच पुढे सरकले.

Maharashtra Times 20 Jul 2017, 5:05 pm
मटा ऑनलाइन वृत्त | नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम video of congress vice president rahul gandhi in loksabha goes viral
राहुलशी हस्तांदोलन करण्यास अब्दुल्ला विसरले


काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या फजितीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी ते उठून उभे राहिले, पण अब्दुल्ला त्यांच्याकडे न पाहताच पुढे सरकले आणि राहुल यांच्यावर हात जोडून खाली बसण्याची नामुष्की ओढवली, असं या व्हिडिओत दिसतंय.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात फारुख अब्दुल्ला यांनी खासदारकीची शपथ घेतली. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांशी हस्तांदोलन करून त्यांनी आभार मानले. ते पहिल्या रांगेतील नेत्यांशी हात मिळवून पुढे-पुढे जात असताना, मागच्या रांगेत बसलेले राहुल अचानक उभे राहिले. अब्दुल्ला आपल्याशीही हस्तांदोलन करायला येतील, असं त्यांना अपेक्षित असावं. पण त्यांच्याकडे लक्षही न देता अब्दुल्ला पुढे निघून गेले. त्यामुळे राहुल यांची फजिती झाली. लांबूनच नमस्ते म्हणून राहुल गांधी यांनी सारवासारव केली आणि ते खाली बसले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज