अ‍ॅपशहर

sharad pawar : दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडमधील हिंसाचाराला केंद्र जबाबदारः शरद पवार

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीतील शेतकऱ्यांतच्या ट्रॅक्टर परेडला हिंसाचाराचं वळण लागलं आहे. या सर्व घटनेवरून राजकारणही तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Jan 2021, 8:25 am
नवी दिल्लीः दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडमध्ये झालेल्या हिंसाचाराला ( violence in farmers protest ) केंद्र सरकार जबाबदार आहे. सरकार कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरले आहे, अशी टीका माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( sharad pawar ) यांनी केली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sharad pawar
दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडमधील हिंसाचाराला केंद्र जबाबदारः शरद पवार


आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीत शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर परेड काढली. पण या ट्रॅक्टर परेडला हिंसक वळण लागलं. अनेक ठिकाणी पोलिसांवर हल्ले झाले. एक पोलिस अधिकाऱ्यावर तलवारीने वार करण्यात आले. तसंच पोलिसांचे शस्त्रही हिसकावण्यात आली. दिल्लीत लाल किल्ल्यावर झेंडावरी फडवण्यात आला. यामुळे दिल्लीतील वातावरण तणावाचं बनलं आहे. या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा सधला आहे.

'केंद्र सरकारचे अपयश'

दिल्लीत कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही केंद्र सरकारची आहे. पण आजची स्थिती पाहता सरकार कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरले आहे. पंजाब, हरयाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकरी शांततेत आंदोलन करत होते. पण सरकारने त्यांना गांभीर्याने घेतलं नाही. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा संयम संपला आणि त्यांनी दिल्लीत दिल्लीत ट्रॅक्टर मोर्च काढला. दिल्लीतील कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही केंद्राची आहे. पण सरकार त्यात अपयशी ठरले, असं शरद पवार म्हणाले.

दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडमध्ये हिंसा, अमित शहांची तातडीची बैठक

आंदोलनाची छबी बिघडवण्यामागे राजकीय पक्षांचा हात, शेतकरी नेत्यांचा आरोप

दिल्लीत जी काही हिंसा झाली त्याचे समर्थन कुणीही करणार नाही. पण त्यामगचे कारण दुर्लक्ष करून चालणार नाही. आंदोलन करणारे शेतकरी भडकले आहेत. कारण केंद्र सरकारने आपली जबाबदारी पार पाडलेली नाही. सरकारने प्रगल्भतेने आणि योग्य पद्धतीने निर्णय घ्यावा, असं शरद पवार म्हणाले.

ज्या प्रकारे आज शेतकरी आंदोलन हाताळण्यात आलं हे अतिशय खेदजनक आहे. विरोधी पक्षांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. पण शेतकऱ्यांनी आता आपल्या गावी शांततेत परतावं. आरोप करण्याची सरकारला कुठलीही संधी देऊ नका, असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज