अ‍ॅपशहर

‘प्रज्ञासिंह यांना माफी नाही’

'साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना माफ करणार नाही,' अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी संताप व्यक्त केला. महात्मा गांधीजींचा मारेकरी नथुराम गोडसे याला देशभक्त संबोधणाऱ्या ठाकूर यांच्या विधानाबद्दल मोदी यांनी तीव्र नाराजीही व्यक्त केली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 May 2019, 11:05 am
वृत्तसंस्था, खरगोन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम we will never accept pragya singhs apologies
‘प्रज्ञासिंह यांना माफी नाही’

'साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना माफ करणार नाही,' अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी संताप व्यक्त केला. महात्मा गांधीजींचा मारेकरी नथुराम गोडसे याला देशभक्त संबोधणाऱ्या ठाकूर यांच्या विधानाबद्दल मोदी यांनी तीव्र नाराजीही व्यक्त केली.

मध्य प्रदेशातील आपल्या अखेरच्या प्रचारसभेनंतर वृत्तवाहिनीशी बोलताना पंतप्रधानांनी गांधीजींबाबतच्या स्वपक्षीय नेत्यांच्या विचारांशी असहमती दर्शवली. 'गांधीजी आणि गोडसेविषयीची वक्तव्ये घृणास्पद आणि निषेधार्ह आहेत. सुसंस्कृत समाजासाठी ही भाषा अशोभनीय आहे. अशी वक्तव्ये करण्यापूर्वी सर्वांनी १०० वेळा विचार करायला हवा. त्यांनी आपल्या विधानाबद्दल माफी मागितली असली, तरी माझे मन त्यांना कधीही क्षमा करणार नाही,' असे मोदी यांनी सुनावले.

बेताल सुरूच...

- सात दशकांनंतर वाद-प्रतिवाद. गोडसेलाही आनंद झाला असता... - केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे

- गोडसेने एकाचीच हत्या केली. राजीव गांधींनी १७ हजार लोकांना मारले... - भाजप खासदार नवीन कटील

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज