अ‍ॅपशहर

'आम्ही साध्वींना उमेदवारी दिली नसती'

'भारतीय जनता पक्षाच्या भोपाळमधील उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी दिवंगत पोलिस अधिकारी हेमंत करकरे यांच्याबाबत जी विधाने केली ती आम्हाला ...

महाराष्ट्र टाइम्स 29 Apr 2019, 1:19 am
भोपाळ : 'भारतीय जनता पक्षाच्या भोपाळमधील उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी दिवंगत पोलिस अधिकारी हेमंत करकरे यांच्याबाबत जी विधाने केली ती आम्हाला अजिबात मान्य नाहीत', असे स्पष्ट करून, 'साध्वी ठाकूर यांना आमच्या पक्षाने कधीही उमेदवारी दिली नसती', अशा भावना केंद्रीय मंत्री व रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांनी व्यक्त केल्या.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम we would not have given candidacy to sadhvi pragya says ramdas athawale
'आम्ही साध्वींना उमेदवारी दिली नसती'


'नागरिकांचा बचाव करताना, दहशतवाद्यांशी लढताना करकरे हुतात्मा झाले. माझ्या शापाने करकरे यांचा मृत्यू झाला, हे साध्वींचे विधान अनुचित व निषेधार्ह आहे. आमच्यापुरते बोलाल तर आम्ही त्यांना कदापी लोकसभेची उमेदवारी दिली नसती', असे आठवले म्हणाले.

'एनडीएला लोकसभेच्या ३५० जागा मिळतील', असे भाकित वर्तवून, 'नंतर मोदी मला मंत्रिमंडळात चांगले खाते देतील, अशी आशा आहे', अशी टिपणी आठवले यांनी केली!

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज