अ‍ॅपशहर

mirabai chanu : मीराबाई चानूला २ कोटींचे बक्षीस आणि प्रमोशन, रेल्वे मंत्र्यांची घोषणा

भारताच्या मीराबाई चानूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. वेटलिफ्टिंगमध्ये तिने रौप्य पदक जिंकले आहे. तिच्या या चमकदार कामगिरीचे भारतात कौतुक होत असून तिचे मायदेशात जोरदार स्वागत करण्यात आले. रेल्वे मंत्र्यांनी तिला २ कोटींचे बक्षीसाची घोषणा केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Jul 2021, 8:42 am
नवी दिल्लीः ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचणाऱ्या वेटलिफ्टर मीराबाई चानूचे ( weightlifter mirabai chanu ) देशात जोरदार स्वागत झाले. क्रडी मंत्रालयाकडून आयोजित एका कार्यक्रमात क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर, क्रीडा राज्यमंत्री निशिथ प्रामाणिक यांच्यासह किरेन रिजीजू, सर्वानंद सोनोवाल आणि जी कृष्ण रेड्डी हे केंद्रीय मंत्रीही उपस्थित होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Mirabai Chanu
मीराबाई चानूला २ कोटींचे बक्षीस आणि प्रमोशन, रेल्वे मंत्र्यांची घोषणा


रिजीजू आणि सोनोवाल हे आधी क्रीडा मंत्री होते. ऑलिम्पिकच्या काही आठवड्यापूर्वी अनुराग ठाकूर हे क्रीडा मंत्री झाले. अनुराग ठाकूर यांनी ट्वीटरवर एक फोटो शेअर केला. यासह त्यांनी हा आमचा विजयी पंच असं ट्वीटमध्ये म्हटलं आहे. हिमाचली टोपी, शॉल देऊन चानू आणि तिच्या प्रशिक्षकांचा ठाकूर यांनी गौरव केला.

रेल्वे मंत्र्यांकडून २ कोटीच्या बक्षीसाची घोषणा

रेल्वे आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही मीराबाई चानूचं अभिनंदन केलं. यावेळी त्यांनी मीराबाई चानूला २ कोटींच्या बक्षीसासह प्रमोशन देण्याचीही घोषणा केली. मीराबाई चानू ही स्पोर्ट्स कोट्यातील रेल्वेची कर्मचारी आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. आगामी काळात भारतीय खेळाडू आणखी पदक जिंकतील, असं मीराबाई चानूचे प्रशिक्षक यावेळी म्हणाले.

देशवासियांच्या शुभेच्छांमुळे आणि प्रेमामुळे मी हे पदक जिंकू शकले. अधिकाधिक तरुणांनी क्रीडा क्षेत्रात प्रवेश करून देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करावी, असं आवाहन मीराबाई चानूने केलं.

Mirabai Chanu: मीराबाई चानूवर धनवर्षाव... एक कोटींच्या बक्षिसासह नोकरीची मु

मणिपूरच्या मीराबाई चानून ऑलिम्पिक स्पर्धेत ४९ किलो वजनी गटात एकूण २०२ किलो वजन उचलून शनिवारी रौप्य पदक जिंकले. यापूर्वी वेटलिफ्टींगमध्ये २००० ला झालेल्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये कर्णम मल्लेश्वरीने कांस्य पदक जिंकले होते.

assam mizoram border : आसाम-मिझोराम सीमेवर हिंसाचारात ६ पोलिस ठार, ट्वीटरवर मु

महत्वाचे लेख