अ‍ॅपशहर

अरुंधती रॉय यांचा 'त्या' वक्तव्याबाबत माफीनामा

सुप्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय यांनी भारतीय लष्कराशी संबंधित केलेल्या एका जुन्या वक्तव्याप्रकरणी माफी मागितली आहे. आपण आपल्या आयुष्यात एखाद्या क्षणी चुकीने काहीतरी बोलतो, जे मुर्खपणाचे असते. ही चिंतेची बाब आहे. 'माझ्या वक्तव्यामुळे कोणत्याही प्रकारचा संभ्रम निर्माण झाला असल्यास मी माफी मागते', अशा शब्दात रॉय यांनी आपले म्हणणे मांडले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Dec 2022, 9:03 am
नवी दिल्ली: सुप्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय यांनी भारतीय लष्कराशी संबंधित केलेल्या एका जुन्या वक्तव्याप्रकरणी माफी मागितली आहे. आपण आपल्या आयुष्यात एखाद्या क्षणी चुकीने काहीतरी बोलतो, जे मुर्खपणाचे असते. ही चिंतेची बाब आहे. 'माझ्या वक्तव्यामुळे कोणत्याही प्रकारचा संभ्रम निर्माण झाला असल्यास मी माफी मागते', अशा शब्दात रॉय यांनी आपले म्हणणे मांडले आहे. रॉय यांनी सुमारे ९ वर्षांपूर्वी केलेल्या एका वक्तव्याचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी रॉय यांच्यावर टीका करण्यास सुरू केले होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम arundhati roy
अरुंधती रॉय यांचा 'त्या' वक्तव्याबाबत माफीनामा


अरुंधती रॉय यांनी सन २०११ मध्ये वादग्रस्त वक्तव्य करताना म्हणतात, 'काश्मीर, मणिपूर, मिझोराम आणि नागालँडसारख्या राज्यांमध्ये आम्ही युद्ध करत आहोत. आम्ही १९४७ पासूनच आम्ही काश्मीर, तेलंगण, गोवा, पंजाब, मणिपूर, नागालँडमध्ये लढत आहोत. भारत एक असा देश आहे, ज्याने आपलेच सैनिक आपल्याच लोकांसमोर उभे केले. पाकिस्तानने देखील अशा प्रकारे आपले लष्कर कधी आपल्याच लोकांविरोधात तैनात केले नाही'.

पूर्वोत्तर राज्यांमध्ये आदिवासी, काश्मीरमध्ये मुस्लीम, पंजाबमध्ये शीख आणि गोव्यात ख्रिश्चनांविरुद्ध भारतीय राज्ये लढत आहेत. असे वाटते जणू हा उच्चवर्णीय हिंदूंचाच देश आहे, असे अरुंधती रॉय यांनी पुढे म्हटले होते.

रॉय माफी मागताना म्हणाल्या की, कधी कधी आपण मूर्खपणाचे वक्तव्य करतो. हा एक छोटासा व्हिडिओ माझे संपूर्ण विचार व्यक्त करत नाही. तसेच या व्हिडिओद्वारे जे मी वर्षानुवर्षे लिहित आले, ते माझे एकूण विचार काय आहेत ते स्पष्ट होत नाही. मी एक लेखिका आहे आणि तुम्ही उच्चारलेले शब्द हे तुमच्या विचारांपेक्षा अधिक महत्त्वाचे असतात असे मी मानते. ही अतिशय चिंतेची बाब आहे, आणि व्हिडिओ क्लिपमधील वक्तव्याच्या एखाद्या भागामुळे निर्माण होत असलेल्या संभ्रमाबद्दल मी माफी मागते.'

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज