अ‍ॅपशहर

मंगळयानाने भारताला काय दिले? 'मॉम' नसल्याने देशाचे काय नुकसान होणार

Mangalyaan: भारताने ५ नोव्हेंबर २०१३ रोजी मंगळयान अंतराळात पाठवले होते आणि ते २४ सप्टेंबर २०१४ रोजी मंगळाच्या कक्षेत पोहोचले. तब्बल ८ वर्ष ८ दिवसानंतर ही मोहिम संपुष्ठात आली.

Authored byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Oct 2022, 1:23 pm
नवी दिल्ली: इस्रोच्या मंगळ मोहिमेची सांगता झाली आहे. ‘मार्स ऑर्बायटर मिशन’ (मॉम) या भारताच्या पहिल्या मंगळयानाचा संपर्क तुटला आहे. इस्रोच्या या मोहिमेने भारताला आणि इस्रोला खुप काही दिले आहे. पण आता ही मोहिम संपली आहे, आता त्यामुळे देशाला आणि इस्रोचे काय नुकसान होणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Mangalyaan


मंगळयानच्या लॉन्चिंगनंतर भारत अशा मोजक्या देशांच्या यादीत पोहोचला होता ज्यांनी मंगळ ग्रहाच्या दिशेने यान सोडले होते. ११ महिन्याचा प्रवास करून मंगळयान ग्रहाच्या जवळ पोहोचले होते. इतक नाही तर प्रथमच एखाद्या देशाने पहिल्या प्रयत्ना यान मंगळ गृहात यशस्वीपणे पोहोचवले होते.

मंगळयानाला सहा महिन्यासाठी पाठवण्यात आले होते. पण तुम्हाला विश्वास बसणार नाही की हे यान ८ वर्ष, ८ दिवस कार्यरत होते. अखेरच्या श्वासापर्यंत ते मंगळाच्या भोवती फिरत होते. हा एक वैज्ञानिक चमत्कार म्हणावा लागले. मंगळ यानाने सर्वात लांब आणि सर्वात जवळ जाऊन फोटो काढले. यामुळे मंगळाचे फुल डिस्क मॅप करता आला. हे काहीच नाही, प्रथमच मंगळ ग्रहाचा डिमोस फोटो तयार करता आला. आजवर कोणत्याही देशाला अशी कामगिरी करता आली नाही.

वाचा- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका: दुसऱ्या टी-२० सामन्यात इतिहास घडला, तब्बल १३ विक्रम झाले

मंगळयानाच्या मार्स कलर कॅमेऱ्याने १ हजार १०० हून अधिक फोटो काढले. ज्यामुळे मार्स एटलस तयार झाला. या मोहिमेमुळे मंगळ ग्रहावर ३५ हून अधिक रिसर्च पेपर प्रसिद्ध झाले. देशाने आणि इस्रोने कधी विचार देखील केला नसेल की फ्कत ४५० कोटी रुपायत एवढे मोठे मिशन पूर्ण होऊ शकले. पहिल्याच प्रयत्ना मंगळावर पोहोचण्याचा विक्रम अमेरिका, रशिया आणि युरोपातील देशांना करता आला नाही.

वाचा- आम्ही सूर्यकुमारला न खेळवण्याचा विचार करतोय; वर्ल्डकप तोंडावर असताना रोहित शर्मा हे काय बोलून गेला

मंगळ यानावरील MENCA यंत्राने सांगितले की तेथे जमीनीपासून २७० किलोमीटर उंचीवर ऑक्सीजन आणि CO2 किती प्रमाणात आहे. आता मंगळयानाने पाठवलेल्या माहितीवर संपूर्ण देशातील आणि जगभरातील लोक रिसर्च आणि स्टडी करू शकतात.

काय परिणाम होणार

- यापुढे भारताला मंगळ ग्रहाची माहितीसाठी अमेरिका आणि अन्य देशांवर अवलंबून रहावे लागेल

- जोपर्यंत मंगळ यान २ पाठवले जाणार नाही तोपर्यंत मंगळ ग्रहाची कोणतीही बातमी येणार नाही

- कोणताही नवा नकाशा तयार करता येणार नाही, तसेच नवे संशोधन होणार नाही
लेखकाबद्दल
जयकृष्ण नायर
जयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख