अ‍ॅपशहर

...तर शरीफ, मुशर्रफ तेव्हाच ठार झाले असते!

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ आणि माजी लष्करप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ ही जोडगोळी कारगिल युद्धादरम्यानच मारली गेली असती, अशी माहिती वायुसेनेच्या गुप्त कागदपत्रांमधून समोर आली आहे.

Maharashtra Times 25 Jul 2017, 10:28 am
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम when an iaf pilot was almost ready to bomb nawaz sharif musharraf during kargil war
...तर शरीफ, मुशर्रफ तेव्हाच ठार झाले असते!


पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ आणि माजी लष्करप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ ही जोडगोळी कारगिल युद्धादरम्यानच मारली गेली असती, अशी माहिती वायुसेनेच्या गुप्त कागदपत्रांमधून समोर आली आहे. भारताच्या एका जग्वार विमानानं गुलतेरी या पाकच्या रसद पुरवठा केंद्रावर लेसर किरणांनी नेम धरला होता, पण दुसऱ्या जग्वार विमानाचा निशाणा चुकला आणि शरीफ-मुशर्रफ थोडक्यात बचावले, अशा घटनेची नोंद या कागदपत्रांमध्ये आहे.

२४ जून १९९९ च्या सकाळी भारतीय वायुसेनेची लढाऊ विमानं नियंत्रण रेषेजवळ बॉम्ब फेकण्यास झेपावली होती. त्यावेळी जग्वार एसीएलडीएसने पॉइंट ४३८८ला लक्ष्य केलं होतं. गुलतेरीचं केंद्रावर लेजर बास्केटनं नेम धरला होता. त्याच्या मागून उडणारं विमान त्या दिशेनं बॉम्ब डागणार होतं. पण नेमक्या वेळी बॉम्बची दिशा चुकली आणि तो मश्कोह खोऱ्यात पडला. त्यानंतर, जी माहिती मिळाली ती खूपच स्फोटक होती. ज्यावेळी विमानानं गुलतेरीच्या केंद्रावर नेम धरला होता, त्यावेळी नवाझ शरीफ आणि परवेझ मुशर्रफ त्याच ठिकाणी त्यांच्या सैनिकांशी संवाद साधत होते. म्हणजेच, नेम चुकला नसता, तर हे दोघंही जागीच ठार झाले असते. ही माहिती उघड झाल्यास त्याचे तीव्र पडसाद उमटतील, हे लक्षात घेऊन ही कागदपत्र गुप्त ठेवण्यात आली होती.

...म्हणून बॉम्बहल्ला थांबवला!

दरम्यान, नियंत्रण रेषा न ओलांडण्याचे स्पष्ट आदेश वाजपेयी सरकारनं वायुसेनेला दिले होते आणि म्हणूनच आपण हा हल्ला थांबवला, निशाणा चुकला नव्हता, तर ठरवून हा निर्णय घेतला होता, असं स्पष्टीकरण माजी एअर मार्शल ए के सिंह यांनी दिलंय. शरीफ आणि मुशर्रफ गुलतेरीच्या केंद्रावर आहेत, हे आम्हाला ठाऊक नव्हतंच. पण ते माहीत असतं तरीही आम्ही हल्ला केला नसता, कारण भारताची ती वृत्ती नाही, असं त्यांनी आवर्जून सांगितलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज