अ‍ॅपशहर

आसाराम बापू म्हणाला, 'मी गाढव आहे'

अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली जोधपूर जेलमध्ये कैद असलेला स्वयंघोषित धर्मगुरू आसाराम बापूला राग अनावर झाला. तुम्ही कथा वाचक आहात की संत या विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना 'मी गाढव आहे', असं उत्तर आसारामने दिलं.

Maharashtra Times 15 Sep 2017, 8:30 am
मटा ऑनलाइन वृत्त । जोधपूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम when angry asaram called himself a donkey
आसाराम बापू म्हणाला, 'मी गाढव आहे'


अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली जोधपूर जेलमध्ये कैद असलेला स्वयंघोषित अध्यात्मगुरू आसाराम बापूला राग अनावर झाला. तुम्ही कथा वाचक आहात की संत या विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना 'मी गाढव आहे', असं उत्तर आसारामने दिलं.

सलग चार दिवसापासून आसारामची कोर्टात हजेरी सुरू आहे. सतत कोर्टात यावं लागत असल्यानं आसारामचा राग अनावर झाला. त्या दरम्यान कोणी तरी हा प्रश्न विचारताच आसारामचा संयम सुटला. राग, लोभ, माया यांच्यावर मात करा असं प्रवचनात सांगणाऱ्या आसारामचा राग अनावर झाला. भारतीय आखाडा परिषदेने देशातील १४ ढोंगी बाबांची यादी प्रसिद्ध केली असून त्या यादीत आसारामचा समावेश आहे. याआधी बुधवारी आसारामने प्रकृती ठीक नसल्याने मी बोलू शकत नाही, असं म्हटलं होतं. दरम्यान, बलात्काराच्या आरोपाखाली आसाराम गेल्या ४ वर्षापासून जोधपूर जेलमध्ये बंद आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज