अ‍ॅपशहर

काश्मीर तुमचे होते कधी? राजनाथ यांनी फटकारले

काश्मीरच्या मुद्द्यावरून थयथयाट करणाऱ्या पाकिस्तानला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जोरदार फटकारले आहे. ज्या काश्मीरसाठी तुम्ही रडत आहात, ते काश्मीर तुमचे होतेच कधी? असा सवाल करतानाच पाकिस्तानची निर्मिती झाली. त्यामुळे आम्ही तुमच्या अस्तित्वाचा सन्मान करतोय. मात्र, काश्मीरवर तुमचा काहीच हक्क नाही, अशा शब्दांत राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला ठणकावलं.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Aug 2019, 3:40 pm
नवी दिल्ली: काश्मीरच्या मुद्द्यावरून थयथयाट करणाऱ्या पाकिस्तानला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जोरदार फटकारले आहे. ज्या काश्मीरसाठी तुम्ही रडत आहात, ते काश्मीर तुमचे होतेच कधी? असा सवाल करतानाच पाकिस्तानची निर्मिती झाली. त्यामुळे आम्ही तुमच्या अस्तित्वाचा सन्मान करतोय. मात्र, काश्मीरवर तुमचा काहीच हक्क नाही, अशा शब्दांत राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला ठणकावलं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Rajnath-Singh


लडाख येथे राजनाथ सिंह यांनी एका विज्ञान मेळाव्याचं उद्घाटन केलं. त्यावेळी ते बोलत होते. लडाख केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच दौरा आहे. पीओके आणि गिलगिट-बाल्टिस्तानवर पाकिस्तानने अनधिकृतपणे कब्जा केला आहे. पाक व्याप्त काश्मीरमध्ये मानवाधिकाराचं उल्लंघन होत असून अत्याचारही वाढले आहेत. त्याकडे पाकिस्तानने लक्ष द्यायला हवे. १९९४मध्ये आमच्या देशाच्या संसदेनं एक प्रस्ताव मंजूर केला असून त्यात भारताची स्थिती आणि भूमिका स्पष्ट केली आहे, असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज