अ‍ॅपशहर

omicron वेरियंटवरून जागतिक आरोग्य संघटनेचा भारताला सतर्कतेचा इशारा

करोनाचा नवीन वेरियंट 'ओमिक्रॉन'ने जगभरात चिंतेचं वातावरण आहे. आता जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी भारताला ओमिक्रॉनवरून सावधानतेचा इशारा दिला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Nov 2021, 8:46 pm
नवी दिल्ली: कोविड-19 चा नवीन प्रकार 'ओमिक्रॉन' बाबत खबरदारी न बाळगल्यास भारतासाठी मोठा धोका ठरू शकतो, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO ) मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी दिला आहे. सर्व आवश्यक खबरदारी घेणे आणि मास्क वापरत राहण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. आपल्या खिशातील मास्क हा एक प्रकारची लस आहे. इनडोरसाठी हा मास्क अत्यंत प्रभावी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम who chief scientist soumya swaminathan warns india on omicron
omicron वेरियंटवरून जागतिक आरोग्य संघटनेचा भारताला इशारा


ओमिक्रॉनशी लढण्यासाठी विज्ञानावर आधारित धोरणाची गरज आहे. सर्व प्रौढांचे संपूर्ण लसीकरण, मोठ्या प्रमाणात एकत्र येणे टाळणे, व्यापक जिनोम सिक्वेंसिंग, रुग्णांच्या कुठल्याही असामान्य वाढीचे बारकाईने निरीक्षण करणे आवश्यक आहे. या काही टिप्स आहेत, ज्यामुळे शास्त्रज्ञांनी दिल्या आहेत. यामुळे चिंता कमी होऊ शकते, असे त्या म्हणाल्या. एनडीटीव्हीने हे वृत्त दिले आहे. हा प्रकार डेल्टापेक्षा जास्त संसर्गजन्य असू शकतो. अद्याप अधिकृतपणे काहीही सांगता येत नाही आपल्याला काही दिवसांत या नवीन वेरियंटबद्दल अधिक माहिती मिळेल, असे त्यांनी सांगितले.

जागतिक आरोग्य संघटनेने "Omicron" ला ''Variant of Concern'' म्हणून घोषित केले आहे. हे कोविडच्या मागील प्रकारापेक्षा जास्त संसर्गजन्य असू शकते. करोनाच्या इतर प्रकारांपेक्षा ओमिक्रॉन हा अधिक किंवा कमी गंभीर COVID-19 ला कारणीभूत ठरेल, हे तज्ज्ञांना अद्याप स्पष्ट झालेले नाही.

omicron चा वाढता धोका; केंद्र सरकार कठोर, राज्यांना दुसऱ्यांना दिले 'हे' निर्देश

Omicron मुळे जागतिक चिंता वाढली आहे. गेल्या दोन वर्षांपासून साथीच्या रोगामुळे रखडलेल्या आर्थिक सुधारणा पुन्हा एकदा रूळावरून घसरू शकतात. या वेरियंटच्या चिंतेमुळे जगभरातील देशांमध्ये प्रवासी निर्बंधांची एक नवीन लाट आणि शेअर बाजारपेठांमध्ये विक्रीची भीती निर्माण झाली आहे.

omicron : करोनाच्या नव्या वेरियंटमुळे घाबरण्याची गरज नाहीः ICMR

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज