अ‍ॅपशहर

कबड्डीपटू रोहित कुमारच्या पत्नीची आत्महत्या

राष्ट्रीय स्तरावर नावाजलेला कबड्डीपटू रोहित कुमार याची पत्नी ललिता (२७ वर्ष) हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.दिल्लीतील नानग्लोई परिसरात राहणारी ललिता ही मंगळवारी राहत्या घरात मृतावस्थेत आढळली.

Maharashtra Times 18 Oct 2016, 2:59 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम wife of kabaddi player rohit kumar commits suicide
कबड्डीपटू रोहित कुमारच्या पत्नीची आत्महत्या


राष्ट्रीय स्तरावर नावाजलेला कबड्डीपटू रोहित कुमार याची पत्नी ललिता (२७ वर्ष) हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

दिल्लीतील नानग्लोई परिसरात राहणारी ललिता ही मंगळवारी राहत्या घरात मृतावस्थेत आढळली. तिच्या मृतदेहाशेजारी सुसाइड नोट सापडली आहे. सुसाइड नोटमधील हस्ताक्षर ललिताचेच आहे का? याचा पोलीस तपास करीत आहेत.

रोहित कुमार हा राष्ट्रीय स्तरावरील कबड्डीपटू असून प्रो- कबड्डी लीगच्या तिसऱ्या सत्रात तो पाटणा पायरेट्स संघाकडून खेळला होता. रोहित कुमार हा मूळचा हरयाणाचा असून त्याला २००९ साली स्पोर्ट्स कोट्यातून नौदलात नोकरी मिळाली आहे. सहा महिन्यांपूर्वीच त्याचे ललितासोबत लग्न झाले होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज