अ‍ॅपशहर

ग्राऊंड फ्लोअरवर मेहुणीची बर्थडे पार्टी; वर पती-पत्नीचा वाद टोकाला; बंद दाराआड घडलं भयंकर

पती पत्नीमधील वादाचा भयंकर शेवट झाला आहे. सासरी परतण्यास नकार दिल्यानं पतीचा पारा चढला. त्यानं पत्नीवर कात्रीनं अनेक वार केले. त्यावेळी खालच्या मजल्यावर बर्थडे पार्टी सुरू होती.

Authored byकुणाल गवाणकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Feb 2023, 3:12 pm
गाझियाबाद: मेहुणीच्या वाढदिवसाला पतीनं सासरवाडीत पत्नीची हत्या केल्याचा प्रकार उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये घडला. घटना घडली त्यावेळी मृत महिलेची आई, आजी, भाऊ, बहिण घरात होते. काही शेजारीदेखील घरी आले होते. तळमजल्यावर पार्टी सुरू होती. तर पहिल्या मजल्यावर पती-पत्नीचा वाद सुरू होता. यादरम्यान संतापलेल्या पतीनं पत्नीवर कात्रीनं अनेक वार केले. घंटाघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम man kills wife


शुक्रवारी रात्री आठच्या आसपास घटना घडल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त अंशू जैन यांनी दिली. 'मृत पावलेल्या वंशिकाचा विवाह २०२० मध्ये नरेशशी झाला. शुक्रवारी नरेशची मेहुणी आस्थाचा वाढदिवस होता. त्यासाठी नरेश आर्यनगरात असलेल्या त्याच्या सासरवाडीत गेला होता. त्यावेळी तो वंशिकाला पहिल्या मजल्यावर घेऊन गेला. त्यानं आतून दार लावून घेतलं. यानंतर दोघांमध्ये वाद झाला,' असं जैन यांनी सांगितलं.
कपाळावर कुंकू लावलं, हातात चुडा घातला अन् मृत्यूला कवटाळलं; फ्लॅटमध्ये प्रेमी युगुलाचा अंत
नरेशनं वंशिकाला घरी चल सांगितलं. तिनं स्पष्ट शब्दांत नकार दिला. यानंतर दोघांमध्ये बंद खोलीत भांडण झालं. वंशिका ऐकत नसल्यानं नरेशनं खोलीत असलेल्या कात्रीनं तिचा गळा, पोट, छातीवर सपासप वार केले. त्यानंतर तो खोलीतून बाहेर पडला आणि फरार झाला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

वंशिका बराच वेळ खाली न आल्यानं कुटुंबीयांनी तिच्या फोनवर कॉल केले. मात्र तिनं प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे कुटुंबीय वरच्या खोलीत पोहोचले. तेव्हा त्यांना वंशिका रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. तिला तातडीनं एमएमजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
जीव देतोय! तरुणाचं ट्विट, पोलिसांकडून रात्रभर पाठलाग; सकाळी कर्जत स्टेशनला पोहोचले तर...
वंशिकाला नरेशच्या चारित्र्यावर संशय होता. त्याचे अन्य महिलेशी संबंध असल्याची शंका वंशिकाला होती. त्यामुळे लग्नाच्या अवघ्या ६ महिन्यांनंतर वंशिका सासर सोडून माहेरी राहू लागली. त्यामुळे दोघांमधील वाद वाढतच गेला. वंशिकानं नरेशविरुद्ध कोर्टातही धाव घेतली.
लेखकाबद्दल
कुणाल गवाणकर
महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.... आणखी वाचा

महत्वाचे लेख