अ‍ॅपशहर

एंजल शर्माच्या प्रेमात पडला पती; 'तसले' फोटो पाठवले; ती त्याचीच पत्नी निघाली; पुढे काय घडलं?

Madhya Pradesh News: मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये एका महिलेनं फेसबुकवर खोटं आयडी बनवून स्वत:च्या पतीचा पर्दाफाश केला आहे. महिलेनं एंजल शर्मा नावानं एक आयडी तयार केलं. महिलेनं एंजल शर्मा नावानं फेक आयडी तयार केलं. त्या माध्यमातून फेसबुकवर पतीशी मैत्री केली. पत्नीला पतीचा खरा चेहरा जगापुढे आणायचा होता. त्यामुळे तिनं फेसबुकवर नाव बदलून पत्नीशी संवाद सुरू केला.

Authored byकुणाल गवाणकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Dec 2022, 9:27 am
इंदूर: मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये एका महिलेनं फेसबुकवर खोटं आयडी बनवून स्वत:च्या पतीचा पर्दाफाश केला आहे. महिलेनं एंजल शर्मा नावानं एक आयडी तयार केलं. महिलेनं एंजल शर्मा नावानं फेक आयडी तयार केलं. त्या माध्यमातून फेसबुकवर पतीशी मैत्री केली. पत्नीला पतीचा खरा चेहरा जगापुढे आणायचा होता. त्यामुळे तिनं फेसबुकवर नाव बदलून पतीशी संवाद सुरू केला. हळूहळू पती मोकळा होऊ लागला आणि त्याचा पर्दाफाश झाला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mp fake id


माझे पती तीन वर्षांपूर्वी मला सोडून नागपुरला गेले. मी एक काल्पनिक आयडी (एंजल शर्मा) बनवून त्यांच्याशी संपर्क साधला. मला त्यांच्या चारित्र्यावर शंका होती. त्यामुळे मी फेक आयडी बनवून त्यांच्याशी बोलू लागले. त्यांनी मला स्वत:चे कित्येक अश्लील फोटो पाठवले. हे सगळं अतिशय घृणास्पद होतं. याच प्रकरणाच्या मी जनसुनावणीसाठी आले आहे, असं पीडित महिलेनं सांगितलं.
हृदयद्रावक! रिसेप्शनच्या दिवशीच तरुणाचा मृत्यू; तीन दिवसांपूर्वी झाला होता प्रेम विवाह
२००७ मध्ये माझं लग्न झालं होतं. ते माझ्यापेक्षा १९ वर्षांनी मोठे आहेत. आमचं अरेंज मॅरेज झालं. हे नातं निभावण्यासाठी मी सर्वेतोपरी प्रयत्न केले. मला १२ वर्षांचा एक मुलगा आहे. सुरुवातीपासूनच त्यांची वर्तणूक अशीच होती. मात्र तेव्हा माझ्या लक्षात आलं नाही. औषधं घेऊन ते माझं शोषण करायचे. मला शारीरिक पातळीवर खूप त्रास होऊ लागला. त्यामुळे मी कारवाई करण्याचं ठरवलं. तेव्हा ते मुलाला सोडून पळून गेले, अशा शब्दांत महिलेनं तिची व्यथा मांडली.
झालं गेलं विसरू! पतीचा पत्नीला शब्द, पण मंदिरात जाताना अप'घात' झाला; मामला २ कोटींचा निघाला
कुटुंब न्यायालयात तक्रार दाखल केली. मात्र पती तारखांना हजरच राहायचे नाहीत. ते नागपूर विमानतळावर सरकारी नोकरी करतात. मी या प्रकरणात खटला दाखल केला आहे. मात्र कोणतीच मदत मिळत नाही. घटस्फोटदेखील होत नाही. त्यामुळे प्रचंड मनस्ताप सहन होत असल्याचं पीडितेनं सांगितलं. पती आणि मी सोबत राहत असतानाही ते काही तरुणींच्या संपर्कात होते, असा दावादेखील महिलेनं केला. या प्रकरणी महिलेची तक्रार दाखल केली असून तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
लेखकाबद्दल
कुणाल गवाणकर
महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.... आणखी वाचा

महत्वाचे लेख