अ‍ॅपशहर

नपुंसक पतीच्या विरोधात महिलेने केली तक्रार!

पती नपुंसक असल्याचे सांगत २५ वर्षीय महिलेने नौए़़डा महिला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी महिलेने तिचा पती आणि सासरच्यांवर फसवणुकीचा आरोप करत लग्नापूर्वी आपल्यापासून सत्य लपविल्याचे म्हटले आहे. गुन्हा दाखल करताना घटस्फोटासोबतच लग्नासाठी केलेला संपूर्ण खर्च परत देण्याचीही मागणी महिलेने केली आहे.

Maharashtra Times 21 Jun 2017, 12:57 pm
टाइम्स न्यूज नेटवर्क। नोएडा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम woman files case against husband alleging impotency
नपुंसक पतीच्या विरोधात महिलेने केली तक्रार!


पती नपुंसक असल्याचे सांगत २५ वर्षीय महिलेने नोए़़डा महिला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी महिलेने तिचा पती आणि सासरच्यांवर फसवणुकीचा आरोप करत लग्नापूर्वी आपल्यापासून सत्य लपविल्याचे म्हटले आहे. गुन्हा दाखल करताना घटस्फोटासोबतच लग्नासाठी केलेला संपूर्ण खर्च परत देण्याचीही मागणी महिलेने केली आहे.

नौएडामधील सेक्टर १२ मध्ये राहणाऱ्या या महिलेचा २०१५ च्या नोव्हेंबर महिन्यात येथीलच सेक्टर ५१ मधील केंद्रीय विहारमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीशी लग्न झाले होते. लग्नानंतर हे दाम्पत्य हनिमूनसाठी गोव्याला गेले असताना पत्नीला आपला पती नपुंसक असल्याचे समजले. तक्रार नोंदविताना महिलेने स्पष्टपणे सांगितले की, पती शारीरिक संबंधांसाठी तयार होत नव्हता. तो घाबरत होता, त्यामुळे ती त्याच्या अशा वागण्याने त्रासली होती. तिने पतीला डॉक्टरांचा सल्ला घेण्यासही सांगितले. मात्र पतीने त्याकडेही दुर्लक्ष केले. सुरूवातीला पति दिवसा ऑफिसला जात असे, मात्र नंतर त्याने नाइट शिफ्टमध्ये काम करणे सुरू केले. ऑफिसमधून रात्री फार उशीरा आल्यानंतरही पती आपल्याशी न बोलताच झोपी जात असल्याचा आरोपही महिलेने केला आहे.

अखेर कंटाळून हा सर्व प्रकार महिलेने तिच्या माहेरच्यांना सांगितला. दोन्ही कुटुंबांमध्ये या समस्येचा तोडगा काढण्यासाठी चर्चाही झाली. चर्चेनंतर महिलेच्या सासरच्यांकडून पतीसाठी एका चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आश्वासनही देण्यात आले. पण हे आश्वासन पाळले न गेल्याने अखेर पत्नी आपल्या माहेरी जाऊन राहू लागली. या प्रकरणी आरोपी विरोधात कलम ४९८ ए आणि ४२० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे महिला पोलिस ठाण्याच्या अधिकारी अंजू तेवतिया यांनी सांगितले. पोलिस अधिकारी दाम्पत्याशी याविषयी चर्चा करणार असून प्रकरणातून मार्ग न निघाल्यास दोघांनाही कायदेशीर मार्गाने वेगळे होण्याचा मार्ग मोकळा असेल, असेही त्यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज