अ‍ॅपशहर

अजबच! महिलेने दिला चार पाय असलेल्या मुलीला जन्म, लोक म्हणाले हा तर दैवी चमत्कार...

4-Legged Baby Girl Born: महिलेने चार पाय असलेल्या मुलीला जन्म दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुलीला पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली आहे. काही जण तिला दैवी चमत्कार असल्याचं बोलत आहेत. मात्र, डॉक्टरांनी नेमकं कारण स्पष्ट केलं आहे.

Authored byमानसी क्षीरसागर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Dec 2022, 11:00 am
मध्यप्रदेशः मध्यप्रदेशमध्ये एक अजब घटना समोर आली आहे. महिलेने चार पाय असलेल्या मुलीला जन्म दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. डॉक्टरांनी चिमुकलीला अतिदक्षता विभागात दाखल केले आहे. दरम्यान, महिलेच्या नातेवाईकांनी बाळाला पाहण्यासाठी रुग्णालयात एकच गर्दी केली आहे. तर, वैज्ञानिक भाषेत हे एक शारिरीक व्यंग असून त्याला इशियोपेगस असं म्हणतात, अशी माहिती चिमुकलीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4-legged baby girl born


ग्वालिअर येथील कमलराजा रुग्णालयात एका महिलेने चार पाय असलेल्या मुलीला जन्म दिला आहे. सोशल मीडियावर वेगाने मुलीचे फोटो व्हायरल होत आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, हे एक शारिरीक व्यंग आहे. वैज्ञानिक भाषेत याला इशियोपेगस असं म्हणतात. यामध्ये गर्भात वाढणाऱ्या अर्भकाच्या शरीराच्या खालच्या भागाचा अतिरिक्त विकास होत जातो. एक लाखातून एकाला असा आजार होतो. शस्त्रक्रिया करुन ही आपण शरिराचा अतिरिक्त भाग काढून टाकू शकतो, असं डॉक्टरांनी म्हटलं आहे.

वाचाः आयएनएस विक्रांत घोटाळा प्रकरण: सोमय्या पितापुत्रांना मुंबई पोलिसांची ‘क्लीन चीट’

चिमुकलीचे दोन पाय शस्त्रक्रिया करुन काढून टाकण्यात येणार आहे. मात्र, सध्या या मुलीच्या सर्व चाचण्या करण्यात येत असून ती पूर्णपणे सुदृढ आहे, असं रुग्णालयातून सांगण्यात येत आहे.

ग्वालियअर येथील सिकंदर कंपू येथे राहणारी आरती कुशवाह हिने या मुलीला जन्म दिला आहे. आरतीला आधीही दोन मुली आहेत, अशी माहिती तिच्या बहिणीने दिली आहे. आता तिसरी मुलीचा जन्म चार पायांसोबत झाला आहे. त्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. आरतीच्या कटुंबाची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे. ती इतका खर्च करु शकत नाही. त्यामुळं तिचे कुटुंब सरकारकडून मदतीची मागणी करत आहेत.

वाचाः राणा दाम्पत्याच्या अडचणी वाढल्या; नवनीत राणा व रवी राणा यांच्याविरोधात पुन्हा जामीनपात्र वॉरंट

रुग्णालयात गर्दी

चार पायांच्या मुलीला पाहण्यासाठी लोकांनी रुग्णालयात गर्दी केली आहे. सोशल मीडियावरही फोटो व्हायरल होत आहेत. रुग्णालयातील दुसऱ्या रुग्णांचे कुटुंबीयही या मुलीला पाहण्यासाठी वॉर्डमध्ये आले आहेत. तर काही नागरिक या मुलीला चमत्कारी बोलत आहे तर काही जण तिला दैवी अवतार मानत आहे. मात्र, ही एक वैज्ञानिक घटना आहे.

वाचाः धारावीचा प्रकल्प कायद्याच्या कचाट्यात?; अदानीला कंत्राट देण्याच्या निर्णयाला देणार आव्हान
लेखकाबद्दल
मानसी क्षीरसागर
मानसी क्षीरसागर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सिनीअर डिजीटल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत | डिजीटल पत्रकारितेचा सहा वर्षांचा अनुभव आहे | सामाजिक, राजकीय, मनोरंजन याबरोबरच माहितीविषयक आणि विश्लेषणात्मक बातम्यांचे कव्हरेज करण्याची विशेष आवड... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज