मटा ऑनलाइन वृत्त । पाटणा
बिहारमधील सत्ताधारी राष्ट्रीय जनता दलाच्या (राजद) एका आमदारानं १५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना नांलदामध्ये उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाचजणांना अटक केली असून अटकेच्या भीतीनं फरार झालेल्या आमदाराचा पोलीस शोध घेत आहेत.
लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचा नवादा मतदारसंघातील आमदार राजवल्लभ यादव यानं हा भंयकर प्रकार केला आहे. पीडित मुलीनं स्वत: पोलीस ठाण्यात जाऊन यादवविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ राजवल्लभ यादवच्या बंगल्यावर छापा टाकला आणि पीडित मुलीला आमदाराकडं नेणाऱ्या सुलेखा देवी, तिचा पती अरुणकुमार, तिची आई राधादेवी, मुलगी छोटी कुमारी, बहिण तुलसीदेवी या पाच जणांना अटक केली. ६ फेब्रुवारी रोजी सुलेखा देवीने मुलीला आमदाराच्या बंगल्यावर नेले व त्या ठिकाणी आमदाराने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, अशी माहिती पोलीस उपमहासंचालक शालिन यांनी दिली.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर राजवल्लभ यादवला पक्षातून निलंबित करण्यात आल्याची माहिती राजदचे प्रदेशाध्यक्ष रामचंद्र पूर्वे यांनी दिली. तर राजवल्लभ सध्या फरार असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल, असे नालंदाचे पोलीस अधीक्षक आशिष कुमार यांनी सांगितले.