अ‍ॅपशहर

बिग बींचा चेहरा ओळखून गमावले १.७५ लाख

'अभिनेत्याचा चेहरा ओळखा, बक्षीस जिंका', या टीव्हीवरच्या स्पर्धेत बिग बी अमिताभ बच्चन यांचा चेहरा अचूक ओळखणाऱ्या महिलेनं, बक्षीस मिळण्याऐवजी १ लाख ७५ हजार रुपये गमावल्याचा प्रकार अहमदाबादमध्ये घडला आहे. सफियाबानो शेख असं या महिलेचं नाव आहे.

Maharashtra Times 30 Mar 2016, 10:18 pm
मटा ऑनलाइन वृत्त। अहमदाबाद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम woman identifies amitabh bachchan on tv loses 1 75 lakh
बिग बींचा चेहरा ओळखून गमावले १.७५ लाख


'अभिनेत्याचा चेहरा ओळखा, बक्षीस जिंका', या टीव्हीवरच्या स्पर्धेत बिग बी अमिताभ बच्चन यांचा चेहरा अचूक ओळखणाऱ्या महिलेनं, बक्षीस मिळण्याऐवजी १ लाख ७५ हजार रुपये गमावल्याचा प्रकार अहमदाबादमध्ये घडला आहे. सफियाबानो शेख असं या महिलेचं नाव असून तिनं सायबर क्राइम विभागात तक्रार दाखल केली आहे.

सफियाबानो शेख टीव्ही पाहत असताना, एका वाहिनीवर कलाकाराचा चेहरा ओळखण्याची स्पर्धा सुरू होती. त्यांनी स्क्रीनवरच्या नंबरवर फोन केला आणि चेहरा अमिताभ बच्चन यांचा असल्याचं सांगितलं. त्यावर, तुम्ही १२.८० लाख रुपयांचं बक्षीस जिंकल्याचं समोरून सांगण्यात आलं आणि फोन कट झाला. त्यानंतर, बऱ्याच दिवसांनी सफियाबानो यांना वेगळ्याच नंबरवरून फोन आला. तुम्हाला बक्षिसाची रोख रक्कम हवीय की कार?, असं त्यांना विचारण्यात आलं. बक्षिसाची रक्कम मिळवण्यासाठी तुम्हाला अमूक खात्यात पैसे भरावे लागतील, असं म्हणून त्यांना अकाउंट नंबरही देण्यात आले. १२ लाखाच्या बक्षिसाच्या मोहापायी, कशाचीही खातरजमा न करता सफियाबानो यांनी १.७५ लाख रुपये खात्यांमध्ये जमा केले. त्यानंतर त्यांना बक्षिसाबाबत कुठलाच फोन न आल्यानं आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

आता या प्रकरणाचा तपास सायबर क्राइम विभाग करतोय. बोगस फोन कॉल्स, बनावट ई-मेलपासून सावध राहण्याचं आवाहन पोलिसांकडून वारंवार केलं जातं. परंतु, पैशाच्या लालसेपायी नागरिक कशी चूक करतात, हेच या निमित्तानं पुन्हा समोर आलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज