अ‍ॅपशहर

मुख्यमंत्र्याचे स्टेजवरच घेतले महिलेने चुंबन

बेंगळुरूमध्ये आयोजित एका कार्यक्रमात कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामैया यांचे एका महिलेने स्टेजवरच चुंबन घेतले. मुख्यमंत्र्यांच्या गालावर चुंबन घेतल्याचा व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Maharashtra Times 26 Jun 2016, 6:37 pm
मटा ऑनलाइन वृत्त । बेंगळुरू
महाराष्ट्र टाइम्स.कॉम woman kisses karnataka cm siddaramaiah in public
मुख्यमंत्र्याचे स्टेजवरच घेतले महिलेने चुंबन


बेंगळुरूमध्ये आयोजित एका कार्यक्रमात कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामैया यांचे एका महिलेने स्टेजवरच चुंबन घेतले. मुख्यमंत्र्यांच्या गालावर चुंबन घेतल्याचा व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुख्यमंत्री कोरबा समाजाने असल्याने कोरबा समाजाने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनेकांचा सन्मान करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गिरिजा श्रीनिवासन या महिलेचा सन्मान करण्यात आला. सन्मान करण्यात आल्यानंतर गिरिजा श्रीनिवास या महिलेने चक्क मुख्यमंत्र्यांच्या गालाचे चुंबन घेतले. गालाचे चुंबन घेतल्यानंतर ती लगेच स्टेजवरून खाली उतरली. स्टेजवरील हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाल्याने सोशल मीडियावर व्हायरल होतोय. गिरिजा श्रीनिवास ही महिला चिकमागलूर जिल्ह्यातील तारिकेरेतील तालुका पंचायत सदस्य असून ती सिद्धरमैया यांच्या मतदारसंघातील सुद्धा आहे. तसेच ती राज्यातील एका मंत्र्यांची नातेवाईक आहे.

कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना गिरिजा म्हणाली, ते (सिद्धरामैया) माझ्यासाठी वडिलासमान आहेत. मी त्यांना अप्पा म्हणून हाक मारते. मी शाळेत असल्यापासून त्यांची चाहती आहे. मी त्यांना पहिल्यांदाच भेटले. त्यामुळे मला खूपच आनंद झाला व त्यांचे चुंबन घेतल्याशिवाय राहावले नाही.

#WATCH: A woman kisses Karnataka CM Siddaramaiah during a state-level program of Kuruba Community in Bengaluru.https://t.co/oyG6IuqROW— ANI (@ANI_news) June 26, 2016

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज